Home विदर्भ गलवान घाटीत शहीद झालेल्या सैनिकांना शक्ती फाऊंडेशन तर्फे श्रध्दांजली….!

गलवान घाटीत शहीद झालेल्या सैनिकांना शक्ती फाऊंडेशन तर्फे श्रध्दांजली….!

127

यवतमाळ – भारत आणि चिनमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्यास तणावामुळे 16 जुन 2020 ला डि-एक्सलेशन च्या प्रक्रिये दरम्यान लडाख च्या गलवान घाटीमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. यामध्ये एका अधिकार्‍यासह वीस जवान शहिद झाले. या घटनेचा शक्ती फाऊंडेशन यवतमाळ ने तिव्र शब्दात निषेध करून या घटनेमध्ये शहिद झालेल्या सर्व सैनिकांना 20 जुन रोजी लोहारा-वाघापुर बायपास रोडवरील सानेगुरूजी नगर येथे सोशल डिस्टसिंगचे पालन करीत श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक जावेदभाई परवेज अन्सारी, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, शक्ती ङ्गाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रियंका राजकुमार बिडकर, उपाध्यक्षा प्रतिभा पवार, सचिव अश्‍विनी वाढवे, माजी सरपंच विक्की राऊत, वाशीम मवाल, आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

शक्ती फाऊंडेशन यवतमाळ च्या सदस्यांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा संकल्प घेतला. शहिदांना श्रध्दांजली अर्पित करतांना नगरसेवक जावेद परवेज अंसारी यांनी शहिदांचे स्मरण करून चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन व्यापारी व नागरीकांना केले.तसेच शक्ती फाऊंडेशन यवतमाळला सहकार्य करण्याचे अभिवचनही यावेळी दिले.
सोशल डिस्टसिंगचे सर्व नियम पाळुन मेनबत्ती प्रज्वलन करून शहिदांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी रितु गायकवाड, वर्षा पडवे, विद्या मडावी, रविना भोवते, कविता नागदिवे, राजश्री मानकर, पायल मनवर, शिवदास कांबळे, सिडाम सर, आदि प्रामुख्याने उपस्थित होते.