Home सोलापुर “सन्मान कोरोना योध्यांचे” , सोलापूरचे पालकमंत्री ना.दत्ता भरणे यांच्या हस्ते सन्मान….!

“सन्मान कोरोना योध्यांचे” , सोलापूरचे पालकमंत्री ना.दत्ता भरणे यांच्या हस्ते सन्मान….!

239

वागदरी / नागप्पा आष्टगी

जीवाची पर्वा न करता आपली कर्तव्यनिष्ठा कोरोना महामारीत प्रामाणिकपणे बजावणाऱ्या योध्याचा सन्मान म. बसवेश्वर साहित्य परिषदआणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य मराठी संघाच्या वतीने पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

सोसिएल डिस्टन्स ठेऊन, मास्क लावून हा सन्मान सोहळा येथीलअक्कलकोट पंचायत समिती सभागृहात संपन्न झाला.आमदार सचिन कल्यांणशेट्टी,सिध्दाराम म्हेत्रे व मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी,सोलापूर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अतिरिक्त पो. अधीक्षक अतुल झेंडे व इतर प्रशासकीय आधिकारी या वेळीउपस्थित होते. विश्वगुरु म. बसवेश्वर साहित्य परिषद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने हा उपक्रम स्वामींनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने राबवण्यातआला.
तहसिलदार अंजली मरोड,उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, मुख्याधिकारी आशा राऊत,वैद्यकीय अधिकारी,डॉ.अशोक राठोड, डॉ. अश्विन करजखेडे,पीआय कल्लप्पा पुजारी,सुभाष जाधव,पीएसआय सोनाली गोडबोले – पाटील , पो.नाईक धनराज शिंदे , इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार अशपाक मुल्ला यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी विश्राम पटेल , शिवराज बिराजदार , बाबुराव चव्हाण , जहांगीर शेख, रविकांत सुतार,केदार कडगंची,मुज्जशीम पाशा पिरजादे यांचे सहकार्य लाभले.