Home विदर्भ दुष्काळी अनुदाना पासुन सावकार ग्रस्त शेतकरी वंचित……

दुष्काळी अनुदाना पासुन सावकार ग्रस्त शेतकरी वंचित……

201

रमेश रामचंद्र खिरकर यांनी केली तक्रार…..

देवानंद खिरकर

अकोला – अकोट तालुक्यातील रामापूर येथिल शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर गट नंबर 21 मधिल 1.62 आर जमीन अवैध सावकार सरिता विजय चांडक यांच्या नावे आहे.परंतू सदर शेतीचा ताबा हा 20/4/1998 पासुन शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर यांचाच आहे.शेतीचा वायदा,पिकविमा,हा खिरकर हेच दरवर्षी भरतात.या आधी मदत सुध्दा खिरकर यांच्याच खात्यात जमा केलेली आहे.असे असतांना यावर्षी ग्रामसेवक,तलाठी,यांनी सदर शेताची दुष्काळी अनुदानाची 12,800 रुपये रक्कम ही चुकून सरिता चांडक यांच्या खात्यात जमा केली होती.परंतू चांडक यांनी 12,800 रुपये रक्कम चा चेक हा गेल्या 21 दिवसा पासुन तहसीलदार अकोट यांचे नावे वापस केला आहे.तरी सुध्दा आज परंत तहसीलदार अकोट यांनी 12,800 रुपये रक्कम ही रमेश रामचंद्र खिरकर यांच्या खात्यात वळती केलेली नाही.व मला विनाकारण,हेतूपुरसस्परपणे, नाहकत्रास देत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी अकोला,आमदार मिटकरी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.व सदर 12 800 रुपये रक्कम माझ्या खात्यात त्वरित टाकण्याची मागणी केली आहे.