Home विदर्भ मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविल्या प्रकरणी न्युज १८ इंडियाचा अैकर व मालकावर यवतमाळ...

मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविल्या प्रकरणी न्युज १८ इंडियाचा अैकर व मालकावर यवतमाळ येथे गुन्हा दाखल !

192

वासीक शेख

यवतमाळ – हजरत खॉजा मोईनोद्दीन चिश्ती अजमेरी रह.यांना लुटेरा व आक्रांता म्हणुन मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविल्या प्रकरणी न्युज १८ इंडियाचा एन्कर अमिश देवगण याच्यावर तंज़ीम अमीने शरीयत,यवतमाळच्या वतीने यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की १६ जून २०२० रोजी ठिक 8:30 वा.न्युज इंडिया 18 चे अैकर अमिश देवगन याने एका कार्यक्रमात जाणुन बुजून धार्मिक भावना दुखाविण्यासाठी मुस्लीम समाज व सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले हजरत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती गरीब नवाज रह.यांचे बद्दल लुटेरा व आक्रांता हे अपमानजनक शब्द वापरून मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे। या घटनेची दखल घेत यवतमाळ येथील तंज़ीम अमीने शरीयत,यवतमाळच्या वतीने यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारींमध्ये न्युज इंडिया 18 चे एन्कर अमिश देवगण व न्यूज़ चॅनेल चे मालकावर कलम 29 (अ) भादवि व तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावी अशी लेखी तक्रार देण्यात आली आहे। यावेळी तंज़ीम अमीने शरीयत , यवतमाळचे अल्लामा मौलाना अलहाज हज़रत हाफिज़ुल्ला खां साहब क़ादरी (बरार मुफ्ती),अल्लामा मौलाना रज़ा क़ादरी साहब , अल्लामा मौलाना वसीम काज़ी मिन्हाज मालनस साहब , एडवोकेट एजाज तगाले साहब , फिरोज खान साहब , हैदर अली क़ाज़ी , सैय्यद इमरोज़ , अनवार क़ादरी शोएब अकाबानी साहब , तौसीफ भाई आदी उपस्थित होते.