Home विदर्भ पुष्पलता गिरोलकर यांना कर्मवीर कोरोना योद्धा सन्मानपत्र…!

पुष्पलता गिरोलकर यांना कर्मवीर कोरोना योद्धा सन्मानपत्र…!

620

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. १८ :- यवतमाळ शहरातील त्रिवेणी महिला बचतगट चामणवाडी येथील अध्यक्षा पुष्पलता गिरोलकर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहतात . सध्या परिस्थितीत त्यांनी कोरोनामुळे सील करण्यात आलेल्या शहरातील प्रतिबंधित भागात त्यांनी स्वतः राशन वाटप केले . त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत ऑल इंडिया घुमंतू जनजाती फाउंडेशन कडून त्यांचा कर्मवीर कोरोना योद्धा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला .

तसेच कोविड १९ या विषाणूजन्य आजाराने थैमान घातलेल्या शहरातील बऱ्याचशा झोपडपट्टी आहेत तेथेही त्यांनी धान्यकिट , गरजू वस्तू पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासली . म्हणून त्यांना हे सनमानपत्र देवून गौरविण्यात आले . याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .