Home नांदेड पेरणी करताना बळीराजाला कन्याला पोस्ट बँकेनी शेतात दिले बँकेतील पैसे काडून

पेरणी करताना बळीराजाला कन्याला पोस्ट बँकेनी शेतात दिले बँकेतील पैसे काडून

703

किनवट – दि. १७ रोजी भिशी येथील येथील खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे.
मागील आठवड्यात पासून मोसमी पाऊस आगमन झाल्याने जिल्यात पेरणीला चागल्या प्रकारे सुरुवात झाल्याने ज्वारी, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग,तूर या बियाणी पेरणी चालू आहे.

भिशी येथील शेतकरी कन्या सुरूबाई गायकवाड यांना पेरणी करताना बियाणे कमी पडले होते. बाहेर गावी जाऊन बँकेतील पैसे काढण्या इतका वेळ शेतकरी कन्या जवळ नव्हता शेतात पेरणीसाठी वीस महिला पुरुष पेरणीसाठी मजुरीचे होते.

शेतकरी कन्या सुरूबाई यांनी पोस्ट बँकेचे ब्रँच शाखा पोस्ट मास्तर श्री.ज्ञानेश्वर नूनेवार यांना मोबाईल द्वारे पैशाची मागणी केली.
ब्रँच पोस्ट मास्तर श्री.नूनेवार यांनी सदरील शेताचा पूर्ण पता घेऊन त्यांनी त्याचं क्षणी शेतकरी कन्या सुरूबाई गायकवाड यांच्या शेतात जाऊन एक हात पेरणी यंत्रणा वर दुसरा हाताचा आंगठा पोस्ट बँकेच्या यंत्रणा वर ठेवला आणि ब्रँच पोस्ट मास्तर यांना आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर सांगितले काही सेकंदात मोबाईल वर ओटीपी नंबर आला व शेतकरी कन्या सुरूबाई गायकवाड यांच्या मागणी केल्या प्रमाणे त्यांना Aeps च्या प्रणाली द्वारे पोस्ट बँकेच्या मार्फत पैसे काडून दिले.

वार्तापत्र: ग्राउंड रिपोर्टर सुरेश सिंगेवार [ विपणन कार्यकारी अधिकारी मुख्य पोस्ट ऑफिस नांदेड.

शेतकऱ्यांच्या बांधावर नांदेड जिल्ह्यातील सर्व वाड्या तांड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांनी ग्राम पातळीवर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर पोस्ट बँकेच्या मार्फत पैसे पुरवठा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डाक आधीक्षक यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेतील बँक खात्यातील पैसे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक नी शुल्क काडून देण्याची व्यवस्था देशातील फक्त पोस्ट बँकेत सुरू केली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पहिल्यांदा देशातील पहिली पोस्ट बँक पैसे देत आहे. शेतकऱ्यांचे जय जवान जय किसानचे स्वप्न पोस्ट बँकेमुळे पूर्ण होत आहे.
असे शेतकऱ्यांत चर्चा होत आहे.
पेरणी करताना ब्रँच पोस्ट मास्तर पैसे दिल्याचे समजताच किनवट चे डाक निरीक्षक श्री.आभिनव सिन्हा व नांदेडचे इंडिया पोस्ट बँकेचे प्रबंधक श्री.राजेंद्र मगनाळे यांनी भिशीचे ब्रँच पोस्ट मास्टर श्री.नूनेवार याचे मोबाईल द्वारे अभिनंदन केले आहे.