Home नांदेड नांदेडात मंगळवारी कोव्हिड १९ च्या रूग्णांचा महापुर , जिल्ह्यात पहिल्यांदाच तब्बल २४...

नांदेडात मंगळवारी कोव्हिड १९ च्या रूग्णांचा महापुर , जिल्ह्यात पहिल्यांदाच तब्बल २४ ची भर तर ३ रुग्णांना सुट्टी, यात ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

190

नांदेड , दि. १६ ( राजेश एन भांगे ) – नांदेड जिल्ह्यातील मंगळवार दिनांक 16 जून 2020 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या रुग्णांची संख्या 180 एवढी झाली आहे.

आज 16 जून रोजी प्राप्त झालेल्या एकूण 278 अहवाला पैकी 230 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, व 24 अहवाल हे पॉझिटिव प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 286 एवढी झाली आहे.

यामध्ये 14 पुरुष व 10 महिला रुग्णांचा समावेश आहे..

✔️सदरील रुग्ण हे खालील भागातील आहे : –

☑️सोमेश कॉलनी – 3 पुरुष रुग्ण,
◾️वय वर्ष अनुक्रमे : 22 41, 53 व 1 महिला रुग्ण वय – 23.
☑️शिवविजय कॉलनी – 1 पुरुष वय – 67,

◾️तीन महिला रुग्ण वय वर्ष अनुक्रमे : 3, 37 व 61.

☑️श्रीकृष्ण नगर – 1 पुरुष वय – 61 एक महिला – 29.

☑️फरांदे नगर येथील 1 पुरुष वय – 55,

☑️एम.जी.एम परिसर – एक पुरुष वय 30.

☑️विशाल नगर – 1 पुरुष वय – 49.

☑️बरकतपुरा – 1 पुरुष वय – 36.

☑️परीमल नगर – 1 पुरुष वय -55,

☑️ चिखलवाडी – 1 महिला वय – 52.

☑️दिपनगर – 1 महिला वय -19 .

☑️व तसेच मुखेड – 3 पुरुष रुग्ण .

◾️वय वर्ष अनुक्रमे : 11, 30, 55 व तीन महिला रुग्ण वय वर्ष अनुक्रमे : 38, 50, 65.

☑️सेलू जिल्हा परभणी – 1 पुरुष रुग्ण वय 38.
अशा एकूण 24 रुग्णांचा समावेश आहे.
व या सध्यास्थितीत सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

मंगळवारी सकाळी आणखी 18 रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 286 वर पोहोचली आहे. त्यात नांदेडच्या वजिराबाद भागातील 20 बँक कर्मचाऱ्यांचे स्वॉब घेण्यात आले, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील 12 पुरुष व महिलांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. व अन्य दोन रुग्ण हे शहराच्या अन्य रुग्णाच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. इतर इतर रुग्ण हे नांदेड जिल्ह्याचे विविध भागातील असून सेलू जिल्‍हा परभणीच्या एका रुग्णावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.

आतापर्यंत 286 रुग्णांपैकी 180 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व 13 रुग्णांनी उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 93 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
या रुग्णांमध्ये एक स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 52 आणि 2 पुरुष ज्यांची वय वर्ष 52 व 54 आहेत. तर 5 रुग्णांना उपचारस्तव औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 24 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 286 वर.

☑️ दिवसभरात 3 रुग्णांना सुट्टी.

☑️ आत्तापर्यंत 180 बरे होऊन घरी .

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️13 कोरोना पॉसिटीव्ह.
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️93 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

☑️ 5 रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.

✅️ नांदेड आरोग्य विभागाचे महत्त्वाचे आवाहन!

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.