Home विदर्भ गरजवंत कीर्तनकार गायक वादक यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आव्हान – ह.भ.प.गणेश...

गरजवंत कीर्तनकार गायक वादक यांना आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आव्हान – ह.भ.प.गणेश महाराज शेटे

170

देवानंद खिरकर

संपुर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातिल संत मंडळीचे जे सप्ताह होते ते बंद झालेले आहेत. किर्तनकार , गायक , वादक यांचा कीर्तन करणे , गायन करणे , वादन करणे हा व्यवसाय नसुन परंतू कीर्तन केल्या नंतर गायन केल्यानंतर , वादन केल्या नंतर,सप्ताह कमेटीचे कार्यकर्ते कीर्तनकाराला , गायकाला , वादकाला जे मानधन द्यायचे त्यामूळे त्यांचा प्रपंच चालत होता व परमार्थही होत होता.

परंतू सद्या अखंड हरीनाम सप्ते बंद पडले आहे व कधी सुरु होतिल याची शास्वती सुध्दा नाही.70 टक्के कीर्तनकार,वादक,गायक ही मंडळी परिस्थितीने गरिब आहेत.करिता महारास्ट्रातील दानशूर दात्यांंना विनंती आहे की आपल्या स्वईच्छेने दिलेल्या संपर्क नंबरवर फ़ोन करा.आपण ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यातिल गरजवंत कीर्तनकार , गायक , वादक,आपल्या घरी येतिल आपण त्यांना आदराने शाल,श्रीफळ,देवून मानधन देवून त्यांचा गौरव करावा व या पवित्र कार्याला सहकार्य करावे असे आव्हान ह.भ.प.गणेश महाराज शेटे यांनी केले आहे.
मो.नं.9767112112,9834621159.