
नांदेड. – पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समिती नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ई मेलद्वारे मागणी केली आहे .
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे हे गेली अनेक वर्ष पत्रकारांसाठी अहोरात्र झटत आहेत .पत्रकारांच्या मागण्यांसाठी बराच वेळेस आंदोलने केली आहेत .एवढेच नव्हे तर पत्रकारांच्या विविध मागण्या शासनाकडून मंजूर करून घेतल्या आहेत .ते पदवीधर आहेत .त्यांना जर राज्यपाल यांनी विधान परिषदेवर संधी दिली तर राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवू शकतील .विनोद पत्रे हे धाडसी व मनमिळावू वृत्तीचे असल्यामुळे पत्रकारांची त्यांचे चांगले संबंध आहेत .पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पत्रकार मधूनच विधान परिषदेवर विनोद पत्रे यांना संधी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ई मेलद्वारे आज दिनांक १५ जुन २०२० रोजी मागणी केली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,जिल्हासचिव शशिकांत गाढे पाटील , दक्षिण विभाग प्रमुख प्रशांत बारादे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .











































