
यवतमाळ / अकोला बाजार :- वडगाव जंगल पोलीस ठाणे अंतर्गत अकोला बाजार येथे पोलीस उपविभागीय अधिकारी माधुरी बावीस्कर यांचे हस्ते पोलीस चौकीचे उदघाटन करण्यात आले.


अकोला बाजार ही वडगाव जंगल पोलीस ठाण्याअंतर्गत मोठी बाजारपेठ आहे. या गावाला परिसरातील तीस चाळीस गावे जुळलेली आहे . मागील पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन ठाणेदार व सध्या दारव्हा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उदयसिंह चंदेल यांनी याठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू केले होते. ठाणेदार नरेश रणधीर यांनी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात रूजु होताच अकोला बाजार येथे पोलीस चौकी सुरू करण्याची इच्छा व्यक्त करून जागेचा शोध सुरू केला. येथील ग्रामपंचायतने ठाणेदार रनधीर यांचे विनंतीवरून ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील एक हाॅल उपलब्ध करून दिला .येथे पोलीस चौकी सुरू झाल्याने येथे बिट जमादारासह पोलीस कर्मचारी नेहमी हजर राहुन ठाणेदार यांच्या पोलीस चौकीला वारंवार भेटी राहणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वडगाव पोलीसांकडुन नागरिकांच्या मदतीने परिसरात जातीय सलोखा अभियान राबविण्यात येत आहे .
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी माधुरी बावीस्कर यांचा तंटामुक्त समिती अध्यक्ष आरीफ बुधवाणी , पोलीस पाटील राजेश काटपेलवार , मधुकर डाखोरे, हर्षला लांबट यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. ठाणेदार नरेश रनधीर यांचा हबीबखाॅ पठाण, प्रवीण मोगरे, दयाशंकर अवथरे यांनी सत्कार केला. पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश सावरकर यांचा राजु मादेशवार, प्रभू बंडीवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना योध्दा म्हणून जमादार बालाजी ससाणे व भाउराव बोकडे यांचा पोलीस उपविभागीय अधिकारी माधुरी बावीस्कर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वतः सुरक्षितता बाळगावी , सामाजिक अंतर , मास्कचा वापर , सॅनिटायझरचा वापर करून कोरोना संसर्गाला दुर सारावे असे आवाहन माधुरी बावीस्कर यांनी केले . गावात शांतता व जातीय सलोखा अबाधित ठेवण्याकरीता नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती ठाणेदार नरेश रणधीर यांनी यावेळी केली.पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश सावरकर , पांडुरंग कराळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आरीफ बुधवाणी, हबीबखाॅ पठाण, प्रविण मोगरे, दयाशंकर अवथरे , राजेश काटपेलवार , मधुकर डाखोरे, राजु मादेशवार, प्रभू बंडीवार, पांडुरंग कराळे, ओमप्रकाश मनक्षे, रामभाऊ कराळे, शैलेश डाखोरे, अजय जगताप ,प्रवीण देवतळे, शेख शफीभाई , कुणाल कराळे , गणेश जाचक , रामभाऊ कपाट , परिसरातील पोलीस पाटील, नागरिक , पत्रकार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन हमीदखाॅ पठाण यांनी केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










































