Home पश्चिम महाराष्ट्र “ना जातीसाठी ना मातीसाठी” , लढणार्या पञकार संरक्षण समिती ला विधान परिषदेवर...

“ना जातीसाठी ना मातीसाठी” , लढणार्या पञकार संरक्षण समिती ला विधान परिषदेवर संधी द्या…!

672

राज्य सचिव अनिल चौधरी यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी….!

पुणे : – पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना राज्यपाल साहेबांनी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे राज्यसचिव अनिल चौधरी यांनी राज्यपाल यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी केली.

विनोद पत्रे यांना विधानपरिषदेवर संधी दिली तर राज्यातील पत्रकारांच्या समस्या ते सोडवु शकतील. विनोद पत्रे हे पदवीधर पत्रकार असून धाडसी व मनमिळावु वृत्तीचे, त्यांचे पत्रकारांशी चांगले संबंध आहे. ते पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील १० वर्षापासून अहोरात्र झटत असून बऱ्याच वेळेस आंदोलने सुध्दा केली आहेत. पत्रकारांमधुनच विधान परिषदेवर विनोद पत्रे यांना पत्रकारांच्या मागण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीच्या सभासदांन कडून व पञकार मिञांनकडून केली जात आहे.