Home विदर्भ महवितरणचा भोंगळ कारभार….!

महवितरणचा भोंगळ कारभार….!

114

प्रमोद झिले – हिंगणघाट

वर्धा :- हिंगणघाट तालुक्यातील येरनगाव शेतशिवारात गेल्या चार महिन्यापासुन 2 पोल वाकलेल्या स्थितीत आहे. वारंवार विजवितरण कार्यालयात याबद्दल सुचना देवुन सुद्धा विज वितरण कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.


वृत्त असे कि वडनेर विज वितरण अन्तर्गत येत असलेल्या येरनगाव शेतशिवारात ज्ञानेश्वर पुरुषोत्तम महाजन यांचे शेत सर्वे नं. 51/2 या शेतामध्ये वाकलेल्या स्थितीत असुन 17 जाने. 2020 रोजी ही बाब विज वितरण कंपनीला लक्षात आणून दिली पण आज 4 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा या बाबीकडे गांभिर्याने लक्ष न देता लाकडाच्या सहाय्याने पोलला धरुन ठेवण्याचा प्रताप विज वितरण कडून करण्यात आला.
आता खरीप हंगामाची सुरुवात झाली असुन मृग नक्षत्राच्या पावसामुळे पेरणीला वेग आला आहे. शेतकरी राजा पावसाच्या सरीने सुखावला असता विज वितरण कंपनीच्या नाकर्तेपनामुळे परिसरामध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. लोंबकळत असलेल्या तारामुळे पेरणी कशी करायची हा प्रश्न शेतकर्यासमोर पड्ला आहे. या कारणामुळे जर काही अघटित घडण अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतशिवरातील शेतकरी करीत आहे. या गंभीर बाबीकडे पेरणीपुर्वी संबधित अधिकार्यांने लक्ष द्यावे.अन्यथा विज वितरण कंपनीच्या कोणत्याही कर्मचार्याला आम्ही आमच्या बांधावर येवू देणार नाही असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे.