Home विदर्भ मनसेने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभरावर उपशिक्षणाधिकारी यांना धरले धारेवर…

मनसेने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभरावर उपशिक्षणाधिकारी यांना धरले धारेवर…

175

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

जि. प.शिक्षण सभापती आणि

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न …

सभापतींचे कार्यवाहीची आदेश…चौकशी समितीची स्थापना…

यवतमाळ – जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी उपशिक्षणाधिकारी डायरे यांना संपर्क केला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही परिणामी मनसेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडक देत त्यांना फी साठी पालकांना होत असलेला त्रास आणि जिल्ह्यातील खाजगी शाळेच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.कोरोना काळात शासन निर्देश असतांना फी वाढ करण्यात आली.यासर्व विषयी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्रीधर काका मोहोड यांना भेटून यासर्व विषयांवर कडक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात खाजगी शाळांनाही शासन निर्देश असतांना शालेय फी साठी पालकांना त्रास देणे सुरू आहे.कोरोना काळात कुठलीच फी वाढ करण्याचे आदेश असतांना जिल्ह्यातील बहुतांश शाळेने भरमसाठ फी वाढवलेली आहे.मागील वर्षी च्या तुलनेत ५ ते ७ हजार रुपयांची वाढ या वर्षी शाळेने केली आहे.सोबतच पालकांनी पुस्तके घेण्यासाठी पण शाळेत बोलावून पुस्तके विकल्या जात आहे.या सर्व प्रकारा पासून शिक्षण विभाग अंधारात असून त्यांना याची कल्पनाच नाही असे उत्तर उपशिक्षणाधिकारी यांनी देताच मनसेच्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना पालकांना होत असलेल्या त्रासाची आणि पिळवणुकीची माहिती देत धारेवर धरले सोबतच शिक्षण विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे खाजगी शाळांची मुजोरी वाढली असून याला शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केला.उपशिक्षणाधिकारी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे मनसेने शिक्षण सभापती श्रीधर काका मोहोड यांनी संपर्क करून त्यांच्या दालनात खाजगी शाळेच्या या सर्व प्रकारची माहिती दिली .या वर त्यांनी लगेच उपशिक्षणाधिकारी यांना पाचारण करून तात्काळ एक चौकशी समिती नेमुन सर्व शाळांना भेटी देऊन ह्या सर्व तक्रारीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सोबतच दोषी शिक्षण संस्थानवर मी स्वतः फौजदारी कार्यवाही करतो तुम्ही फक्त अहवाल सादर करा असा आदेश उपशिक्षणाधिकारी यांनी दिला. शोकांतिका म्हणजे या बैठकीला उपस्थित शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने आम्ही शाळेची तपासणी करण्यास गेलो तर आम्हाला अक्षरशः दारातूनच हाकलून देतात अश्या शब्दात खाजगी शाळांची मुजोरी ची आपबीती शिक्षण सभापती यांना सांगितली.याप्रसंगी मनसे तर्फे शाळेत पुस्तक विक्रीत पालकांची होणारी पिळवणूक आणि सक्तीची माहिती दिली.

शाळांकडून तुम्ही पूर्ण पुस्तकतच विकत घ्यावे लागते आणि त्यांची किंमत ६००० ते ७००० एवढी असते .सोबतच कन्टेन्ट बुक च्या नावाखाली ४००० ते ५००० रुपये पालकांकडून घेण्यात येते.पालकांनी कन्टेन्ट बुक घेतल्या शिवाय त्यांना शालेय अभ्यासक्रमाचे पुस्तकं देण्यात येत नाही, शिक्षण संस्थांनी नुसता धंदा उघडला असून यावर कोणाचेच नियंत्रण नाही. लॉक डाउन च्या काळात एवढा पैसा आणायचा कुठून हा प्रश्न पालकांना पडला आहे.मुळात शाळेत पुस्तक विक्रीची परवानगी दिली कोणी..? यावर शिक्षण विभाग काय कार्यवाही करणार असा सवाल मनसेने उपस्थित केला.सोबतच यवतमाळ शहरातील काही शाळेत मुलांना आपल्या संस्कार आणि धार्मिक संस्कार चे पालन करण्यास बंदी असून त्यांच्या धर्माची सर्व चालीरीती मुलांना पाळाव्या लागतात.हा सर्व प्रकार चीड आणणारा असून सर्व धर्म समभावाच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे.यावर मनसेचे देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी अश्या शाळांविरोधात कडक पावले उचलून यांची मुजोरी आणि मस्ती जिरवण्याची मागणी मनसेने या प्रसंगी केली. जोपर्यंत राज्य सरकार आणि शिक्षण विभागा मार्फत शाळा उघडण्या संदर्भात नवीन आदेश देण्यात येत नाही तो पर्यंत पालकांनी कोणत्याच प्रकारची फी अथवा पुस्तके विकत न घेण्याचे आवाहन मनसेने तर्फे करण्यात येत आहे. आणि कोण्या शाळेने यासाठी सक्ती केल्यास आणि कोणत्याही शाळेने मुलांना त्यांच्या धार्मिक चालीरीती चे पालन करण्यापासून मज्जाव केल्यास मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहन देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी केले आहे.