Home विदर्भ देवळीत आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन

देवळीत आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन

177

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आरोग्य विभागातील रिक्त पदावर सामावून घ्या – संगीता रेवडे

वर्धा – राष्ट्रीय आरोग्य आभियान अंतर्गत विविध पदावर २००५ पासून कार्यरत कर्मचाऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या पद भरतीत शासन / जिल्हा परिषद सेवेतील रिक्त पदावर सामावून घ्यावे असे आयटक कंञाटी नर्सेस युनियनच्या राज्य सरचिटणीस संगीता रेवडे यांनी व्यक्त केले .
आयटक संलग्न कंञाटी नर्सेस युनियन .आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समीतीने ११ जून पासुन कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या
संगीता रेवडे पुढे म्हणाल्या शासनाने आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना शासन / जि.प सेवेत सामावून घेण्यासाठी ञिसदस्य समिती नेमली सामावून घेण्याचे आश्वासन दिले १५ वर्षा पासून कमी मानधनावर महाराष्ट्राची मान उंचावेल अशी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देत आहेत शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद मधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे जवळपास १६ हजार रिक्त पदे असून त्यात सामावून घेतले पाहिजे हिच मुख्य मागणी आहे .नाही तर तिव आंदोलन करण्यात येईल अशा इशारा दिला.

वर्धा ६२३ कर्मचारी सहभागी झाले आहेत वर्धा जिल्ह्यातील ८ तालुक्यात आंदोलन करण्यात आले.

देवळी येथे झालेल्या आंदोलनात जयश्री ढोले ललीता वाघ पदमा खडसान सविता गोटेकर पिया कांबळे स्वाती धोंगडे शालु मसराम सरला पारिसे चेतन बाभुळकर राजू सेलोटे प्रगती डूकरे राखी पंचभाई वनमाला मडारी हुसना बानो शेख शिला मडावीनलीनी वाघमारे सारिका मेढें कांचन कन्नाके वैशाली कांबळे सचिन कुमरे इत्यादी कर्मचारी सहभागी झाले होते.