
रावेर – शरीफ शेखजळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांचे वडाळे भोई गावाजवळ अपघातात निधन झाले. दोन दिवसांच्या सुट्टीमुळे ते घरी जात असताना १५० फूट खोल दरीत त्यांची गाडी कोसळल्याची माहिती मिळत आहे. गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शहा यांना ओळखीच्या इसमाने अपघाताची माहिती कळविली आहे. अत्यंत मितभाषी व सालस स्वभावांचे डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांच्या अपघाताचे वृत्त येताच अमळनेर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.











































