Home नांदेड धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात सकाळी ५ , तर सायंकाळी १६ रुग्ण पाॕझेटिव्ह तर...

धक्कादायक” नांदेड जिल्ह्यात सकाळी ५ , तर सायंकाळी १६ रुग्ण पाॕझेटिव्ह तर दिवसभरात २१ रूग्णांची नोंद

132

राजेश एन भांगे

नांदेड – गुरुवार दिनांक 11 जून 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 89 आम्हाला पैकी 62 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 31 रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता 224 एवढी झाली आहे.

✔️आज दिवसभरात प्राप्त झालेले 21 पॉझिटिव रुग्ण खाली प्रमाणे आहेत.
☑️चौफळा भागातील 1 स्त्री वय वर्ष 52,
☑️फरांदे नगर भागातील एक पुरुष वय 52,
☑️खाजा कॉलनी भागातील एक पुरुष रुग्ण वय 67,
☑️उमर कॉलनी भागातील 1 रुग्ण पुरुष वय 16,
☑️देगलूर नाका भागातील 2 रुग्ण आहेत,1 स्त्री वय वर्ष 26 व 1 पुरुष रूग्ण वय वर्ष 16,
☑️ इतवारा भागातील 5 रुग्णांपैकी 4 पुरुष रुग्ण वय वर्ष अनुक्रमे, 16, 26, 28, 62 व 1 स्त्री रुग्ण वय वर्ष 50,
☑️व तसेच गुलजारबाग भागातील 8 रुग्णांपैकी 3 पुरुष वय वर्ष अनुक्रमे 35 41 38 आणि 5 स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्ष 3, 10, 28, 30, 38 असे आहेत.

✔️आणि मुखेड तालुक्यातील 2 रुग्ण आहेत

☑️ज्यांचे वय वर्ष 45 होळीनगर येथील असून 1 रुग्ण वय वर्ष 55 विठ्ठल नगर परिसरातील आहे,
सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

✔️कोरोनाने बँकेतही ‘खाते’
उघडले !

महावीर चौक भागातील एका बँकेच्या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून बँकेचे संपूर्ण निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे व सर्व बँक कर्मचाऱ्यांचे स्वॉब तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

व तसेच आज दिनांक 11 जून 2020 रोजी पंजाब भवन यात्रीनिवास नांदेड येथील 2 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.त्यामुळे सुट्टी देण्यात आलेल्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 139 एवढी झाली आहे.

आतापर्यंत 224 रुग्णांपैकी 139 रुग्णांना रुग्णाच्या सुट्टी देण्यात आली आहे व आतापर्यंत 11 रुग्णांचा उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झालेला आहे.आणि उर्वरित 74 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्णाची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. या रुग्णांमध्ये 1 स्त्री रुग्ण ज्यांचे वय वर्षे 65 आणि 2 पुरुष ज्यांचे वय वर्ष 38 व 74 वर्षे आहे.

गुरुवार दिनांक 11 जून 2020 रोजी 62 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत त्यांच्यावर उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील असे नांदेड आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेली आहे.

✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.

☑️ आज दिवसभरात 21 पॉझिटिव रुग्णांची भर.

☑️ एकूण रुग्ण संख्या 224 वर.

☑️दिवसभरात 2 रुग्णां सुट्टी.

☑️ आत्तापर्यंत 139 बरे होऊन घरी .

☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.

☑️11कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

☑️74 रुग्णांवर उपचार सुरू.

☑️ 1 महिला 2 पुरुष रुग्णाची प्रकृती चिंताजनक.

☑️ एक रुग्ण उपचारास्तव औरंगाबाद येथे संदर्भीत.

दरम्यान जनतेने घाबरुन न जाता गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहून नागरिकांनी दक्षाता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.