
लक्ष्मण बिलोरे
जालना – मराठा क्रांती मोर्चा,व शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज छञपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिना निमित्ताने अभिवादन करण्या आले.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, संतोष गाजरे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख हे उपस्थित होते कोरोणा च्या पार्श्वभूमीवर अंतर ठेवून सर्व प्रथम छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, येत्या काही दिवसांत नगर परिषद मार्फत छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती हायड्रोलीक सीडी बसवणार तसेच छञपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती सीडी बनवण्याचे काम सुरू आहे. या सीडी मुळे अभिवादन करण्यास सोपे जाईल व लवकरात लवकर हे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. तसेच उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी ही शुभेच्छा दिल्या व कोरोणा च्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क वापरावे व शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे सांगितले तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले, येणाऱ्या काही दिवसांनी पाऊस सुरू होणार आहे हा पावसाचा प्रत्येक थेंब हा सॅनिटायझर होऊन पडावा व ही कोरोणा महामारी नष्ट व्हावी असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पडूळ तर उपस्थितांचे आभार अरविंद देशमुख यांनी मानले. यावेळी मराठा महासंघ शहर अध्यक्ष संतोष कऱ्हाळे पाटील, शुभम टेकाळे, प्रा. नससिंग पवार, योगेश भोरे,करण जाधव, किरण देशमुख, शेख इब्राहिम, योगेश ढोबळ, रमेश गजर, मंगेश देशमुख,अनंता मदन, अमोल सुळसुळे, अविनाश कोंदनकर, सचिन ढोबळे, भरत एखंडे, उदय आन्वीकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त हजर होते.











































