Home जळगाव जळगाव शहरात कोविड केअर युनिट स्थापने च्या हालचाली

जळगाव शहरात कोविड केअर युनिट स्थापने च्या हालचाली

174

राजकीय , सामाजिक , शैक्षणिक संस्थेसह डॉक्टरांचा समावेश

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना चा संसर्ग बघता व त्याप्रमाणे मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने जळगाव शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा करणारे यांनी एकत्रित येऊन कोविड केअर युनिट ची स्थापना करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे

५३ सामाजिक संघटनांची सभा

बुधवारी जळगाव शहरातील सर्व सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची एक सभा ईदगाह सभाग्रहात अंजुमन तालीमुल मुस्लिमीन चे उपाध्यक्ष सय्यद चाँद यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सर्वप्रथम या समितीचे मुख्य समन्वयक डॉक्टर जावेद शेख यांनी सभेचे महत्त्व विशद केले. मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सदरचे युनिट स्थापन करण्यामागची पार्श्वभूमी व त्या युनिटचे कर्तव्य याबाबत माहिती सादर केली यावेळी जळगाव शहरातील विविध संघटनांचे खालील पदाधिकारी उपस्थित होते.

कुल जमातीचे बशीर बुरहानी आणि रउफ खान,वहीतद चे अतीक शेख व डॉ वसी अहमद, एम्स चे उमर शेख मुस्तफीज हन्नान,एम आय एम चे नगर सेवक रियाज बागवान व जिल्हा अध्यक्ष ज़िया बागवान, ईदगाह ट्रस्ट चे अनिस शाह व नाजिर मुलतानी, सबील सोसायटी चे इसहाक बागवान,राष्ट्रवादी चे मज़हर खान, जमात-ए-इस्लामी चे मुस्ताक मिर्झा, एम पी जे चे आरिफ देशमुख व मेहमुद शेख,तबलिक जमात चे अख्तर पिंजारी, अमन सोसायटीचे शाहिद सय्यद ,कादरिया फाऊंडेशनचे फारुक कादरी,शिकलगार जमात चे अनवर खान, अमन एज्युकेशनचे रेहान खाटीक ,अकरम देशमुख, आमीर शेख,अताउल्ला खान, इलियास बागवान,राजिक पटेल,तवक्कल पटेल, डॉ वसीम कुरेशी,अरशद खान,तय्यब शेख,मोहसिन पिंजारी, आसिफ मेमन,अफजल पिंजारी, डॉ वकार,डॉ अनीस शाह,साहिल पटेल, बासीद खान,यांची उपस्थिती होती

*२५ वैद्यकीय जनरल प्रॅक्टिशनर ची सभा*

गुरुवारी डॉक्टर मीनाज पटेल यांच्या नियोजित सारा हॉस्पिटलमध्ये जळगाव शहरातील जनरल प्रॅक्टिशनर यांची सभा संपन्न झाली त्यात जळगाव शहरातील एकूण २५ डॉक्टरांची लक्षवेधी उपस्थिती होती यावेळी समितीचे मुख्य समन्वयक डॉक्टर जावेद शेख यांनी या बैठकीचे महत्व विशद केले व फारुक शेख यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या डॉक्टरांना नम्र विनंती केली की आपण आपली जनरल प्रॅक्टिस सुरु करा, आपापल्या वार्डात मोहल्ल्यामध्ये आपण रुग्णांची काळजी घ्या, हा संसर्ग रोग वाढणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आपण सहकार्य करा. त्याचप्रमाणे सदर आजार बरा होण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल यासाठी मार्गदर्शन करा व शासनाला व कोविड केअर युनिट ला सहकार्य करा असे आव्हान केले.

*चर्चेत सहभाग*

डॉक्टर रियाज़ शेख, डॉक्टर इमरान खान,डॉक्टर फारुक शेख डॉक्टर वकार सत्तार, डॉक्टर रईस कासार, डॉक्टर मतीन खाटीक, डॉक्टर मिनहाज पटेल, डॉक्टर आसीम खान, डॉक्टर फिरोज शेख, डॉक्टर अजीजुल्लाह शेख, डॉक्टर नवीद डॉक्टर अनीस शाह व डॉ मोइज देशपांडे यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सूचना व विचार मांडले.
डॉ अताउर रहमान,डॉ सईद अहमद,डॉ वसी अहमद,डॉ इरफान खान,डॉ, नदीम नज़हार, डॉ फारूक सलीम,डॉ अशफाक काकर, डॉ वहाब शेख,डॉ अकबर पठान, डॉ वसीम शाह, यांची उपस्थिति होती.

*लवकरच जिल्हाधिकारी सोबत बैठक*

या वैद्यकीय प्रॅक्टिशनर मधून एक समिती तयार करून त्यांची जिल्हाधिकारी जळगाव सोबत बैठक घेण्याचे फारुक शेख यांनी नियोजन करावे त्याप्रमाणे ही बैठक झाल्यावर प्रशासन व शासनाकडून योग्य ती परवानगी घेऊन या युनिटच्या कार्याला वेगवेगळ्या समित्या मार्फत कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे डॉक्टर जावेद शेख, रियाज बागवान, फारुक शेख, शाहिद सय्यद, फारुख कादरी, अनवर खान,नाजिर मुलतानी यांनी एका पत्रका द्वारे कळविले आहे.