Home विदर्भ परसोडी शिवारात वीज कोसळल्याने सत्तर हजाराची बैलजोडी ठार.!

परसोडी शिवारात वीज कोसळल्याने सत्तर हजाराची बैलजोडी ठार.!

156

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) येथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा परसोडी शिवारात असलेल्या एका गोठ्यावर वीज कोसळली. त्यात कडुनिंबाच्या झाडाखाली बांधून असलेली ७० हजाराची बैलजोडी जागीच ठार झाली. या दुर्घटनेमुळे प्रशांत दौलतराव बडवाईक यांचे ७० हजाराचे नुकसान झाले.
घटनेची नोंद पोलिसांनी व पशुधन विकास अधिकारी डॉ. भिसेकर (वर्धा) आणि स्थानिक पशुचिकित्सक, डॉ. भोसे यांनी सिंदी यांनी घेतली या दोन्ही अधिकाऱ्यांनी बैलाचे पोस्टमार्टेम केले.
काल रविवारी रात्री ९ ते १२ दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या भागात पडला. पावसापेक्षा ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकण्याचे प्रमाण अत्यन्त भयानक होते. मागील पंधरा दिवसापासून सायंकाळी वातावरणात बदल होऊन पाऊस कोसळत आहे. मागील पंधरवाड्यात झालेल्या वादळी पावसात शेतकरी, व्यापारी यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक घराची छप्पर, गोठ्यावरील टिनाचे पत्रे उडत गेले होते. रविवारी रात्री देखील वादळ वारा व पाऊस आला. विजेचा गडगडाट सुरु होता. त्यातच चार तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्ती १२.४० वाजता एक वीज प्रशांत बडवाईक यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या कडू निंबाच्या झाडावर पडली. त्यामुळे झाडाशेजारी बांधून असलेली बैलजोडी भाजल्या गेली व जागीच ठार झाली. कडुनिंबाचे झाड जळाले सोबतच गोठ्याच्या काही भागाला विजेचा स्पर्श झाला.
सदर घटना सोमवारी पहाटे शेतकऱ्याच्या लक्षात आली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन हळहळ व्यक्त केली. या घटनेमुळे ऐन हंगामाच्या तोंडावर प्रशांतचे ७० हजाराचे नुकसान झाले. शासनाने नैसर्गिक आपत्ती समजून शेतकऱ्याला त्वरित मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.