Home मराठवाडा मृत कोरोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचे अहवाल पाॅझीटीव्हज

मृत कोरोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचे अहवाल पाॅझीटीव्हज

157

लक्ष्मण बिलोरे

जालना – मुंबईहून आपल्या मुळगावी परतलेल्या लोकांमुळे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तवली जात असतानाच १९ मे रोजी मुंबईहून मापेगाव बुद्रुक येथे कुटुंबासह परतलेल्या कोरोना संशयित ४५ वर्षीय रूग्णाचा जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.बाजारपेठेच्या गावात तीन दिवसांची ‌संचारबंदी ठेवून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला,अशा परिस्थितीमध्ये मापेगाव येथील मयत कोरोनाग्रस्ध तरूणाच्या संपर्कात आलेल्या २१ जणांचे अहवाल प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी आठ जणांचे अहवाल पाॅझीटीव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.