Home विदर्भ पीपल फॉर ऑनिमल्स व वनविभागाच्या वतीने दूर होत आहे नागरिकामधील वन्य प्राण्याविषयीची...

पीपल फॉर ऑनिमल्स व वनविभागाच्या वतीने दूर होत आहे नागरिकामधील वन्य प्राण्याविषयीची भीती

161

रविंद्र साखरे

वर्धा / तळेगांव शा पंत – साध्यास्थिती मध्ये ग्रामीण भागातील जनता ही कोरोनाच्या प्रदूर्भावाने अतिशय त्रस्त आहे. हाताला रोजगार व्यवस्थित उपलब्ध नसल्याने शेतीकाम शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना पर्याय नाही पण आता आपल्या स्वतःच्या शेतात देखील जाण्यासाठी नागरिक घाबरत होते आणि याचे मुख्य कारण होते परिसरात होत असलेल्या पाळीव प्राण्यांच्या शिकारी. हिवरा ,तांडा, हरराशी या भागात घनदाट जंगल असल्याने साहजिकच वन्यप्रानी सुद्धा मुबलक प्रमाणात आहेत. पण या प्राण्यांविषयी चुकीची माहिती असणे किंवा परिपूर्ण माहिती नसल्याने नाहक नागरिकांच्या हातातून हे प्राणी मृत्युमुखी पडत असतांना या भागातील जनतेतून या प्राण्यांविषयी भीती दूर करण्याच्या तसेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये वन्यप्राण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पीपल फॉर ऑनिमल्स व स्थानिक वनविभागाच्या वतीने अतिशय चांगल्या व सोप्या भाषेत अगदी प्रास्ताविक सादर करत गस्त करून जनजागृती करण्यात आली होती. यामध्ये वन्यप्राणीहे मानवाचे शत्रू नसून मित्र आहेत आणि जश्या मानवाच्या गरजा असतात तश्या प्राण्यांच्या सुद्धा गरजा असतात आणी त्या साठी आपणच त्यांची मदत करायला हवि, व सोबतच काळजी सुद्धा घ्यायला हवी याविषयी अगदी रीतसर मार्गदर्शन पीपल फॉर ऑनिमल्स व वनविभागाच्या वतीने देण्यात आले.
सध्या जंगलाला लागून असलेल्या रहिवाशी वस्तीतील पाळीव प्राण्याच्या शिकारी वन्यप्रान्या कडून होऊ लागल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

त्यांच्या मनातून वन्यप्राण्यांच्या प्रति असलेली भीती यावेळी दूर करण्यात आली. आणि सोबतच काही महत्त्वाचे मार्गदर्शन सुद्धा सूचनांचे पारावे अश्या अनेक प्रकारे या भागातील जनतेला मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाययक डी टी राऊत वनरक्षक टी. डी साबळे, हिंगे, वाघ वनमजुर परतेकी, खडसे वाहनचालक कैलास व पीपल फॉर एनिमल्स चे रोहित कंगाले, ऋषिकेश गोडसे, सुमित जैन, कौस्तुभ गावंडे,मयूर वानखेडे उपस्थित होते.