Home नांदेड भोकर येथील पत्रकार हल्लाप्रकरणी कठोर कारवाई करा – “पत्रकार संरक्षण समिती” ची...

भोकर येथील पत्रकार हल्लाप्रकरणी कठोर कारवाई करा – “पत्रकार संरक्षण समिती” ची मागणी…!

112

नांदेड – भोकर शहरातील हजरत बिलाल नगर भागात राहणारे पत्रकार शेख एजास कुरेशी यांनी स्थानिक पोलीस प्रशासनास विना परवानगी वाहतुकीची माहिती दिली होती . याचा राग मनात धरून दोघांनी पत्रकार कुरेशी यांच्या घरात घुसून मारहाण केली या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भोकर शहरातील हजरत बिलाल नगर भागात राहणाऱ्या पत्रकार शेख एजास कुरेशी यांना पोलीस प्रशासनाची मदत करण्याचा परिणाम भोगावा लागला असून शासनाने बंदी घालून सुद्धा आपल्याजवळील खाजगी वाहनाने परप्रांतातील लोकांना सोडण्यासाठी व दुसऱ्या प्रांतात व दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्या शहरातील लोकांना आपल्या शहरात आणण्यासाठी दामदुप्पट भाडे आकारून विनापरवाना वाहतूक करणाऱ्या भोकर येथील बिलाल नगर येथील रहिवासी शाहरुख व त्याचा भाऊ मोहसीन उर्फ बबलू याची माहीती पोलीसांना एजाज कुरेशी यांनी दिली होती. यांचाच रांग मनात धरून शाहरुख व त्याचा भाऊ मोहसीन उर्फ बबलू या दोघांनी पत्रकार एजाज कुरेशी यांच्या घरात घुसून थापड बुक्क्यांनी मारहाण करून हातातील चांदीची अंगठी काढून घेतली व खिशात असलेले तीनशे रुपयाची रक्कमसुद्धा काढून घेतली धमकी देत तू मोठा पत्रकार झालास तरी आमचं काही वाकडे होणार नाही आम्ही तुला खतम केल्याशिवाय शांत बसणार नाही अशी धमकी दिल्याची लेखी तक्रार एजाज कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांनी आरोपीना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.