July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

नांदेड जिल्ह्यातील नायगाव बा. येथील भारत जिनिंगला भीषण आग….!

नांदेड, दि.२९ ( राजेश एन भांगे ) – नायगाव येथील शेळगाव रोडवर असलेल्या भारत जिनिंगला गुरुवार दि. 28 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. अग्नीशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आग अटोक्यात आणणे अशक्य झाल्याचे घटनास्थळावरील लोकांकडून सांगण्यात येत आहे.
भारत जिनिंग ही डी.बी.पाटील होटाळकर यांच्या मालकीची असून या जिजिंगमध्ये मुखेड,देगजूर,कंधारसह नायगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा कापसू खरेदी येत असतो. आजघडिला या जिनिंगमध्ये खरेदीस झालेला व विक्रीस आलेला जवळपास वीस ते पंचविस हजार क्विंटल कापूसाच्या
ढिगाला आग लागली आहे. लोकांना काही समजण्यापूर्वीच आगीने मोठा पेट घेत उग्ररुप धारण केले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच नायगाव नगर पंचायतची अग्नीशमनची गाडी दाखल झाली.परंतु एका गाडीवर आग अटोक्यात येणे अशक्य असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील अग्नीशमन दलाच्या गाडी पाठविणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून कळविण्यात आले आहे. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळाला असून आगीचे कारणमात्र कळू शकले नाही.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!