Home मराठवाडा मुख्यमंत्री साहेब राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दारूची दुकाने सुरू करणे हाच पर्याय होता...

मुख्यमंत्री साहेब राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दारूची दुकाने सुरू करणे हाच पर्याय होता का ?

154

लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारनेही लागले , लाॅकडाउनची खडक अंमलबजावणी केली .

बाजार पेठ बंद , ढाबे बंद , हाॅटेल्स बंद , दारूची दुकाने बंद , यामुळे कशे आनंदात चालले होते. दारूड्या नवऱ्याची चिल्यापिल्याचे पार्टी जाम मजेत होती नवऱ्याने दारू सोडल्याने नक्किच देव पावल्याची भावना वाढीस लागली होती. दरम्यान , राज्यसरकारने दारूबंदीमुळे राज्याची अर्थव्यवस्था बिघडली असल्याचे विधान केले आणि परवा दारूच्या दुकाना सुरू करण्याचे आदेश दिले . त्यामुळे राज्यातील महिला सरकारवर नाराज झालेल्या आहेत दारूडयांचा तोच हैदोस सुरू राहणार आहे दारूच्या दुकाना सुरू केल्याने घराघरात भांडण,तंटे,कलह माजणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यातून काय साध्य केले.