July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

भिडी येथे वर वधूचे ग्राम पंचायतने केले स्वागत , तर आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी यांचे पञ देवून केले क्वारंटाईन…!

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्हातील देवळी तालुक्यातील भिडी येथील राहूल रामभाऊ फरकाडे यांचे या युवकांचे लग्न यवतमाळ राळेगांव तालुक्यातील शेळीचामाळ येथील मुली सोबत २७ मे येथे संपन्न झाले २)आँनलाईन परवानगी घेवू वर राहूल व त्याचे मामा दिलीप भुजाडे आणि गाडी चालक गजानन बावनकर असे तिन व्यक्ती वधु मंडपी जावून फक्त वर वधूनी साध्या पध्दतीने सामाजिक अंतर ठेवून लग्न आटोपले नंतर दुपारी २ वाजता भिडी येथे फक्त वधुला घेवून आले .लगेल आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांना माहीती दिली . वर वधू ग्राम पंचायत मध्ये आले त्यावेळी सरपंच सचिन बिरे व ग्राम विकास अधिकारी प्रमोद चौधरी यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले जो पर्यत आरोग्य पथक येवून आरोग्य तपासणी करुन क्वारंटाईन करीत नाही तो पर्यत घरात प्रवेश करणार नाही असे वराने सांगितले .
लग्न सोहळ्या जाण्यापूर्वी कुटुंब प्रमुखानी परवानगी पञ आरोग्य विभागाला दिले .परवानगी पञात नमुद केल्या नुसार वाहनाला निर्जंतुकीकरण व सोबत प्रत्येका कडे सँनीटायझर ठेवले होते. आरोग्य सेवक दिलीप उटाणे माधव कातकडे अंगणवाडी सेविका आशा बावनकर सिंधू जिवतोडे सुरेश मानकर विनोद भुजाडे यांच्या आरोग्य पथकाने तपासणी करून वर वधू व इतर दोन व्यक्तीना मा.जिल्हाधिकारी यांचे पञ देवून होम क्वारंटाईन केले.
फरकाडे परिवाराने यवतमाळ जिल्ह्यातून आल्यामुळे स्वताहून आरोग्य विभागास माहीती दिल्या बद्दल आरोग्य विभागाच्या पथकाने टाळी वाजवून अभिनंदन केले गावातील नागरीक आपल्या घरा समोर उभे राहून टाळ्या वाजवून नवदापत्यांचे स्वागत करीत होते हे विषेश १४ दिवस क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीनी राहून आरोग्य विभागास सहकार्य करावे तसेच कुटुंबातील लोकांना संपुर्ण माहिती देण्यात आली.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!