
प्रा.मो.शोएबोद्दीन
अकोला – कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा केला.आलेगावातील प्रत्येक मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण केले.
गत २४ एप्रिलला पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली.आणि दि २५ मे रोजी पवित्र रमजान ईदचा सण कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर आलेगांव जामा मस्जिदचे मौलवी हाफिज जुबेर यांनी मुस्लिम बांधवांना घरीच नमाज पठण चे आवाहन केले.त्यानुसार आलेगावातील मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.तसेच फिजिकल डिस्टनसिंग ठेऊन वयस्क,तरुण व छोट्या बालकांनी एकमेकांना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.तसेच चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांनी आलेगांव पोलीस चौकीमध्ये दि २४ रोजी मिटिंग घेऊन कोरोना विषाणू पृष्ठभूमीवर रमजान ईद सण व नमाज पठण घरीच करण्याचे सांगितले त्यानुसार जामा मस्जिदचे मौलवी हाफिज जुबेर यांनी केलेल्या आवाहना नुसार आलेगांव मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत रमजान ईद उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा केला.










































