Home विदर्भ विजय कोल्हेकर यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर व संबंधित अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा...

विजय कोल्हेकर यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर व संबंधित अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

355

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.

यवतमाळ – दि.२५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या अपघाती मृत्यू झालेल्या विजय कोल्हेकर यांचा
शवविच्छेदन कक्षा समोर झालेल्या अपघाती मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर व अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी करण्यात आली. वाघापूर-पिंपळगाव मार्गावर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून शवविच्छेदन कक्षापुढे चौपदरीकरणाच्या मधोमध पुलाचे काम सुरू असून १५ ते २० फुट खोल खड्डा खोदुन ठेवलेला असुन त्या खड्याच्या आडबाजूला कुठल्याही प्रकारचे सुरक्षा कठडे नसल्याने दुचाकी सह खड्यात पडुन विजय माणिकराव कोल्हेकर(५०)रा.वंजारी फैल यांचा नाहक बळी गेला आहे या संपूर्ण प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व कुंटूबातील कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या पत्नी व दोन मुली असल्याने आर्थिक मदतीचीही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.दि.२४ मे च्या रात्रीच्या सुमारास विजय माणिकराव कोल्हेकर स्कुटीने एम.एच २९ एल ५२५० जात असताना शवविच्छेदन कक्षा पुढे कंत्राटदाराने खोदुन ठेवलेल्या अर्धवट बांधकामाच्या खड्यात
दुचाकीसह थेट वीस फूट खोदून असलेल्या खड्डयात पडून विजय,कोल्हेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.हि बाब दि.२५ मे सोमवारी सकाळच्या सुमारास रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती लोहारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या संपूर्ण प्रकाराची संबंधित कंत्राटदार,अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता ही या हलगर्जीपणा तितकेच जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाघापुरचे विभाग अध्यक्ष संदिप भिसे,उप विभाग अध्यक्ष सौरव पत्रकार,मा.शहर उपाध्यक्ष किशोर कुळसंगे मनसेचे मा.शहर सचिव तथा भारतीय नारी रक्षा संघटनेचे सुकांत वंजारी हे उपस्थित होते.