Home जळगाव डीआरएम रेल्वे प्रबंधक कार्यालयाला झाले १०० वर्ष पूर्ण

डीआरएम रेल्वे प्रबंधक कार्यालयाला झाले १०० वर्ष पूर्ण

129

प्रतिनिधी – लियाकत शाह

भुसावळ – शहरातील रेल्वेच्या डीआरएम अर्थात मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाला सोमवार, २५ मे रोजी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्त कार्यालयावर तसेच कार्यालयाबाहेर ठेवण्यात आलेल्या रेल्वे इंजिनावर आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे. देखरेख व नियंत्रणासाठी कार्यालयाची उभारणी भुसावळ येथून बडनेरा, खंडवा, ईगतपुरी, धुळे आदीपर्यंत हद्द असलेल्या या विभागाला नियंयीत करण्यासाठी २५ मे १९२० रोजी कार्यालयाची स्थापना झाली होती. या कार्यालयात महत्वपूर्ण म्हणजे नियंत्रण कक्ष, वाणिज्य, परीचालन, इंजिनिअरींग, यांत्रिक, कार्मिक, संरक्षा, सुरक्षा, सिग्नल व दुरसंचार, विद्युत आदी विभाग आहेत आणि या विभागातून संपूर्ण भुसावळ मंडळाची देखरेख व नियंत्रण केले जाते. २५ मे १९२० रोजी तत्कालीन निवासी अभियंता जे.एच.फॅन्शवे यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणी झाली होती तर मेसर्स चेलाराम अॅण्ड चत्रुमल कॉन्टॅक्टर्स यांनी इमारतीचे बांधकाम केले होते. रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेली ही इमारत आजही मजबुतीने उभी आहे.