July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करावे – संजय भोसीकर , काँग्रेस नांदेड जिल्हा सरचिटनिस

नांदेड, दि. २६ ( राजेश एन भांगे ) – कंधार , कोरोना विषाणु चा भारतामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये व ग्रामीण भागामध्ये वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पने पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे व आपला बचाव करावा असे आव्हान नांदेड जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी कंधार शहरातील लॉकडाउन मुळे बेरोजगार गरजू कुटुंबांना अन्नधान्य व भाजीपाला वाटप प्रसंगी बोलताना केले.
कोरोना विषाणु ने सबंध जगभर धुमाकूळ घातला असून भारतामध्ये देखील या विषाणु चा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने सबंध देशभरात 25 मार्च पासून लॉकडाउन घोषित करण्यात आला यामुळे छोटे-मोठे उद्योग,व्यवसाय,अनेक प्रतिष्ठानें बंध झाल्या मुळे अनेक कामगारावर,मजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली अशा गरजू कुटुंबांना मदत करण्याचे आव्हान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नामदार अशोकराव चव्हाण व नांदेड जिल्हा प्रशासनाने केले होते याच आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली,लॉकडाउन सुरुवात झाल्या काळापासून भोसीकर कुटुंबियांच्या वतीने अन्नधान्य व भाजीपाला देऊन अश्या कुटुंबाना मदत करण्यात येत आहे आज संजय भोसीकर व सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी कंधार शहरातील बेरोजगार गरजू कुटुंबांना अन्नधान्य व भाजीपाला वाटप केला.संजय भोसीकर सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते कंधार शहरातील अनेक गरजू बेरोजगार कुटुंबांना अन्नधान्य व भाजीपाला वाटप करण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना संजय भोसीकर म्हणाले भारतामध्ये महाराष्ट्र मध्ये व आपल्या नांदेड़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विषाणु च प्रादुभाव झाला असून अनेक दिवस आपल्या नांदेड जिल्हा ग्रीन झोन मध्ये होता परंतु आता नांदेड शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील याचा प्रादुर्भाव सुरुवात झाला असून यासाठी नागरिकांनी शासनाचे नियमाचे पालन करावे आज आपन लॉक डॉउन च्या चौथ्या टप्प्यात आहोत या कालामधे अनेक प्रतिठाने उघड़न्यास शासनाने परवानगी दिली आहे,या महामारी ला घाबरून न जाता खंबीरपणे या संकटाचा सर्वांनी मुकाबला करावा आवश्यक असेल तरच बाहेर पडावे आपल्या घरीच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी जास्तीत जास्त वेळ हाथ धुने,मास्क वापरणे, समाजिक आंतर बाळगने, रोग प्रतिकारक शक्ति वाढवन्यावार भर द्यावा या अश्या अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना कंधार लोहा तालुक्यातील सर्व नागरिकांनी करावे असे आह्वाहन संजय भोसीकर सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!