July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

“पत्रकार संरक्षण समिती” च्या राज्य संघटक पदावर विजयकुमार इंगळे

नाशिक , दि. २४ :- पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) या शासन मान्यताप्राप्त सक्रिय संघटनेच्या राज्य संघटक पदावर महिलांच्या स्वावलंबी , खडतर प्रवास विषयावर दैनिक सकाळ मध्ये “जिद्द” सदराचे लेखन , सकाळ तनिष्कचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांची निवड करण्यात आली.
पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक विनोदजी पत्रे व राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ यांच्या सहीचे निवडपत्र त्यांना देण्यात आले.

राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत मुद्द्यांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा, विशेषतः ग्रामीण / शहरी मानधनावर कार्यरत पत्रकार व वृत्तछायाचित्रकार यांना स्वावलंबी करण्यासाठी अधिक प्रयत्न करू , दरम्यान राज्यभर पत्रकार संरक्षण समितीचे सभासद करू तसेच सक्रियपणे कार्यरत पत्रकारांना संधी दिली जाईल असे यावेळी श्री. इंगळे यांनी सांगितले.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!