June 3, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

लग्नाचा वायफळ खर्च वाचल्याने उपेक्षित गरजुंना जेवण

यवतमाळ / अकोला बाजार – लाॅकडाउनमधील संचारबंदीचे आदेशाला अनुसरून अत्यंत साध्या पध्दतीने आदर्श विवाह करून लग्नसोहळ्यावर होणारा वायफळ खर्च वाचविला . व गावात सुरू असलेल्या अन्नछत्रामध्ये सहभागी होत गावातील उपेक्षित गरजुंना स्नेह भोजन दिले . अकोला बाजार येथील एका नवरदेवाने या भुकेल्यांची जाणीव ठेवून आजच्या युवापिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

येथील ओम रिवाइंडींग वर्क्सचे संचालक रिंकल ओमप्रकाश कोराने या युवकाचा विवाह वर्धा जिल्ह्यातील घोडेगाव ( कोळोना ) येथील वसंतराव देवगडे यांची कन्या प्रतीक्षा हिचेशी जुळला होता .लग्नाची तिथीही ठरली होती. कोराने कुटुंबातील शेवटचे लग्न असल्यामुळे धुमधडाक्याने करायची मनीषा होती. परंतु कोरोनाच्या लाॅकडाउनमुळे विवाह समारंभात अडसर निर्माण झाला. ठरलेल्या लग्नतिथीनुसार 14 मे रोजी कुटुंबातील पाच सदस्यांचे उपस्थितीत वधुमंडपी ( घरी ) जाऊन हा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला. मोजक्या व-हाडींचे उपस्थितीत सोशल डिस्टंसींगचे निकष पाळुन सर्वांनी मास्क लावुन विवाह उरकविण्यात आला .

लग्नाचे दुसरे दिवशी अकोला बाजार येथे वर रिंकलचे घरी विवाह निमीत्त सत्यनारायणाची पुजा करण्यात आली. व नंतर होणारा स्नेह भोजनाचा कार्यक्रम ( रिसेप्शन ) लाॅकडाउनमुळे रद्द करीत गावात सुरू असलेल्या अन्नछत्रामध्ये सहभागी होऊन येथील रंजल्या गांजल्या भुकेल्यांना जेवण देण्यात आले . या अन्नछत्रामध्ये रिंकल व प्रतीक्षा या वर वधुंनी स्वतः गरजुंना भरभरून अन्नाचे डबे दिले .यावेळी गावातील 2000 गरजुंना शिजविलेले अन्नाचे डबे देण्यात आले. उपेक्षित गरजुंनी या अन्नछत्रामधील भोजनाचा आस्वाद घेऊन वधुवरांना शुभ आशिर्वाद दिले . लग्न समारंभावर होणारा वायफळ खर्च वाचवुन भुकेल्यांच्या पोटात अन्नाचा घास भरवीत रिंकलने येथील युवापिढीसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. त्याच्या या कर्तुत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!