May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

शेतकरी संघटनेने मुठभर कापुस झाळून केला शासनाचा निषेध

लक्ष्मण बिलोरे

जालना – कापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले.

२२ मे रोजी सकाळी ११ वाजता पुर्ण राज्यभर हजारो शेतकर्‍यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालुन मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली अाहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर बंद केलेली शासकीय कापुस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरु आहे तसेच एफ ए क्यू च्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास , भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसा संबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी, पुर्ण महाराष्ट्रभर मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला.
केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा अावश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळला आसला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकर्‍यांना सावरण्यासाठी केहीच केले नाही. नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकर्‍यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापुस जाळण्याचे आंदोलन केले. लॉकडाउनचे सर्व नियम पाळुन करण्यात आले.
कांदा व कापुस उत्पादक शेतकर्‍यांच्या भावना व नाराजी सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मधुसुदन हरणे, मा. आमदार वामनराव चटप, मा. आमदार सरोजताई काशिकर, शे.संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, महिला आघाडी अध्यक्षा गिताताई खांडेभराड, युवा अघाडी अध्यक्ष सतिश दाणी, प. म. महिला अाघाडी अध्यछा सीमाताई नरोडे, उ.म. विभाग प्रमुख शशिकांत भदाने सर आदी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी विशेष प्रयत्न केले या आंदोलनाला प्रतिसाद देवून घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील शेतकरी संघटनेचे दिनेश दाड यांनी कापूस जाळून आंदोलनात सहभाग नोंदविला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!