May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

पीआरपी जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांचे वतीने यशवंतनगर मधील गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप

सोलापुर – राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेन्द्रजी कवाडे सर ,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे,राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या वतीने यशवंतनगर नविन आरटीओ ऑफिसच्या पाठीमागिल किर्तीनगर येथील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.देशात व राज्यात कोरोना या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने संपूर्ण देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर केले आहे त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने मोलमजुरी करून उपजिवीका करणाऱ्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरु होती सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी शुक्रवार 22 मे रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने यशवंतनगर मधील किर्तीनगर येथील 20 कुटुंबांना सोशल डिस्टनसिंग पाळून या जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप केले.या जिवनावश्यक वस्तुंच्या एका किट मधे गहु तीन किलो,तांदूळ तीन किलो,साखर एक किलो,हरभरा डाळ एक किलो,मिठ एक किलो,लाईफ़बॉय साबण,व्हिल साबण यांचा समावेश होता.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,गुरु गायकवाड , हेमंत कांबळे , तालुका कार्याध्यक्ष अमित जवंजाळ , तालुका उपाध्यक्ष शंकर पवार , युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन कांबळे , अकलूज शहर अध्यक्ष मिलिंद पवार , उपाध्यक्ष बजरंग वाघमारे , अकलूज शहर संपर्क प्रमुख शिवाजी खडतरे , शहर कार्याध्यक्ष स्वप्निल शिरसट आदि उपस्थित होते.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!