May 29, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

यवतमाळ शहरात अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळला

रवि माळवी

यवतमाळ – शहरातील ऐलीमेंट मॉलचे मागील जंगल भाागत एक ४० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणी अवधुतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना दिनांक २० मे रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. अनोळखी इसमाचा मृतदेह येथील शवविच्छेदन कक्षात पाठविण्यात आला आहे.
अनोळखी ईसमाचा मृतदेह दिनांक २० मे रोजी ऐलीमेंट मॉलचे मागील जंगल परिसरात एका पळसाच्या झाडाखाली पडलेला असल्याचे एका बकरी चारण्याकरीता गेलेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आला. सदर मृत ईसमाची ओळख पटली नसून रमेश किसन पुरी (६५) रा.जनक नगरी वडगांव यांनी सदर प्रकरणी अवधुतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून अवधुतवाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे तसेच पुढील तपास पोलीस करीत आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!