Home विदर्भ लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत , सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत...

लॉकडाऊनचा कालावधी 31 मे पर्यंत , सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकानास परवाणगी

98

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

लॉकडाऊनच्या काळात नियमाचे उल्लंघन करणा-यावर होणार कारवाई

गर्दीच्या ठिकाणाची दुकाने आळीपाळीने सुरु राहणार

सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, दुकाने सुरु राहतील.

वर्धा – राज्य शासनाने 31 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविले असुन संबधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्हयात दुकाने, आस्थापना सुरु ठेवण्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहे, त्यामुळे 31 मे पर्यंत काही प्रतिबंध घालून इतर दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सार्वजनिक,धार्मिक, राजकिय, शैक्षणिक, क्रिडा, मनोरंजनाचे कार्यक्रम, धार्मिक ठिकाणे , सिनेमागृहे इत्यादी वगळता इतर दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवाणगी दिली आहे. मात्र इतर सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधित गर्दीच्या ठिकाणी आळीपाळीने सुरु राहतील.

मात्र दुकाने सुरु ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कटाक्षाने राबवाव्या लागणार आहेत.

वर्धा जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणुन जिल्हाधिकारी यांनी काही प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आहे. हे निर्णय असे आहे.

1. रेल्वे मधील सर्व प्रवासी वाहतुक बंद राहील.

2. आंतर राज्य व आंतर जिल्हा सार्वजनिक बस वाहतुक सेवा पुर्णत: बंद राहतील. तथापि जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुक 50 टक्के क्षमतेने सुरु करता येईल व बस डेपोच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने डेपो सुरु करता येईल मात्र सदर वाहतुक फक्त जिल्हयातंर्गत करण्यात येईल. जिल्हयाबाहेर वाहतुक करण्यास बंदी राहील.

3. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग संस्था पूर्णत: बंद राहतील परंतु ऑनलाईन दुरुस्थ पध्दतीने अभ्यासक्रम चालू ठेवता येईल.

4. हॉस्पीटलीटी सेवा पूर्णत: बंद राहतील. केवळ पोलीस वैद्यकिय कर्मचारी लॉकडाऊन मुळे अडकुन पडलेल्या व्यक्ती यांच्या करीताच सदर सेवा चालू राहतील

5. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, व क्रिडा कॉम्पलेक्स, जलतरण तलाव, मनोंरजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील

6. सर्व सामाजिक /राजकिय / खेळ /करमणुक /शैक्षणिक /सांस्कृतीक /धार्मीक कार्य/ इतर मेळावे. घेण्यास बंदी राहील.

7. सर्व धार्मीक स्थळे/ पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मीक कार्यक्रम, परिषदा इत्यादीवर बंदी राहील.

8. तंबाकुजन्य पदार्थ विक्रीची दुकाने व मॉल या सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

9. लॉक`डाऊन काळात जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेरुन कुठूनही भाजीपाला, फळे, चिकन, मटन व मासे यांच्या वाहतुकीस बंदी राहील. तथापी कांदा, बटाटा, अद्रक, लसुन व फळे ह्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध नाही. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना अनलोडींग पॉईंटचा उपयोग करणे अनिवार्य राहील.

10. ऍपे वाहतुक ही पुढील आदेशापर्यंत बंद राहील.

या व्यतीरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने व व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी परवाणगी आहे. मात्र त्यासाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून परवाणगी देण्यात आली आहे. अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचेअंतर्गत कारवाई करण्यात येईल.

ज्या क्षेत्रात कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहे अशा क्षेत्रात बाहयरुग्ण विभाग आणि दवाखाने सुरु ठेवता येणार नाही.

दुकाने व व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मानक कार्यप्रणाली याप्रमाणे आहे.

1. सर्व प्रकारची दुकाने बाजारपेठा वर्कशॉप हे सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु राहील.

2. केशकर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा हे सकाळी 7 ते 5 वाजे पर्यंत सुरु राहतील. हे ग्राहक पूर्व सूचना देऊन येतील. तसेच ग्राहकांनी स्वतःचा टॉवेल आणि इतर वस्तू सोबत न्यावा. गर्दीचे नीयंत्रण दुकानदाराने करावे.

3. अंत्यविधी व अंत्यविधीशी संबंधित धार्मिक संस्कार करीता जास्तीत जास्त 20 व्यक्ती उपस्थित राहू शकतील परंतु संबधित ग्राम पंचायत, नगर परिषद यांना याबाबत उपस्थितांच्या यादीसह कळविणे बंधनकारक राहील.

4. विवाहाकरीता विवाह ज्या तहसिल कार्यक्षेत्रात असेल तेथील तहसिलदार तथा ईन्सीडन्ट कंमाडर यांना 25 व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करीता परवाणगी देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. विवाहकरीता जास्तीत जास्त 5 व्यक्तीचे बँड पथक वापरता येईल. परंतु त्याकरीता संबधित तहसिलदार यांची परवाणगी घेणे बंधनकारक राहील. तसेच विवाहाकरीता बाहेर जिल्हयात जाण्याचे असल्यास जिल्हाधिकारी यांची परवाणगी घेणे बंधनकारक आहे.

5. दुकान उघडल्यानंतर दुकानाचे तसेच हातळण्यात येणाऱ्या सर्व वस्तुचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. दुकानाचे काउंटर दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

6. सर्व प्रकारची वाहतुक करतांना मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे लागेल.

7. दुकानमध्ये फक्त 04 ग्राहक प्रतिक्षेत राहतील अशी व्यवस्था करावी.

8. सर्व दुकान चालक/ मालकांनी नेहमी वापरात येणाऱ्या कामाच्या जागा हया वारंवार स्वच्छ कराव्यात कामाच्या जागांचे योग्य पध्दतीने आवश्यक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. दर्शनी भागात हात धुण्यासाठी सॅनेटायझर किंवा लिक्वीड सोपची, तसेच तापमान नोंद मशिनची व्यवस्था करण्यात यावी.

9. प्रत्येक कर्मचारी व ग्राहक यांना स्वतंत्र हात धुण्याबाबत व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे हात धुण्याच्या सर्व साहित्याची, व निर्जतुकीकरणाच्या औषधाची पुरेश्या प्रमाणात साठवणुक करुन ठेवावी.

10. दुकानाच्या आवारामध्ये सोशल डिस्टंसींग पाळावे तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
11. दुकानामधील कर्मचारी यांनी देखील लोकांचा संपर्क टाळावा व त्याबाबत योग्य उपायोजना कराव्यात. सर्व कर्मचारी यांनी हात मोजे, मास्कचा नियमीत वापर करावा. आवश्यकता भासल्यास तसेच कोरोना सभांव्य लक्षणे आढळल्यास तात्काळ संबधीत कर्मचारी/ कमगाराची वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी.

12. आजारी व्यक्तीना दुकानमध्ये कामावर ठेऊ नये.

13. बाहेर जिल्हयातुन बोलविण्यात आलेला माल हा जिल्हा प्रशासनाने निश्चीत केलेल्या अनलोडींग पॉईंटवर उतरवुन निर्जंतुकीकरणाची प्रकीया पूर्ण झाल्यानंतरच दुकानाध्ये विक्रीकरीता आणण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत इतर जिल्ह्यातून आलेल्या वाहनांसोबतच्या व्यक्ती वर्धा जिल्हयात प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी.

14. दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकामध्ये एक मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील.

15. .मास्क, रुमाल नाका, तोंडाला झाकुन ठेवील अश्या प्रकारचा असणे आवश्यक राहील.
16. ग्राहकांचा कोरोना विषाणुचा संसर्गापासुन बचाव होण्याकरीता सूचनाबाबतचा फलक दुकानात दर्शनी भागात लावावा . नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये.
17. दुकानामध्ये एकाच वेळी मोठया प्रमाणात अनावश्यक गर्दी होणार नाही यांची खबरदारी दुकान चालक / मालकाने घ्यावी. त्याकरीता प्रतिबंधात्मक उपायोजना दुकान चालक/ मालकाने कराव्यात.
18. दुकानाच्या आवारामध्ये थुकंण्यास प्रतिबंध करण्यात यावे.(विशेष करुन तंबाखु, गुटखा सेवन करुन ).

19. .COVID – 19 आजाराचे निदान करणाऱ्या जवळपासच्या मान्यताप्राप्त दवाखाने व हॉस्पीटलची यादी संपर्क क्रमांकासह कामाच्या ठिकाणी सदैव उपलब्ध करुन दयावी.
20. ग्राहकांची गर्दी दुकानमध्ये वाढल्यास व सुचना देऊनही ग्राहक दुकानमध्ये गर्दी करीत असल्यास दुकानदाराने तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क करुन माहिती दयावी, व दुकान तात्काळ बंद करावे असे न केल्यास व दुकानंमध्ये गर्दी आढळुन आल्यास दुकान पुढील सात दिवस सिल करण्यात येईल.
21. यापुर्वी परवाणगी देण्यात आलेल्या उद्योग, विविध आस्थापना यांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
22. सर्व आस्थापना, दुकाने , शासकिय कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी मालक, कामगार यांना आरोग्य सेतू अँप वापरणे व आपल्या आरोग्यविषयी अद्ययावत माहिती अँपवर भरणे बंधनकारक राहील.
23. जिल्हयात सक्षम प्राधिका-याच्या परवाणगी शिवाय प्रवेश करु नये अनधिकृत प्रवेश केल्यास कारवाई करण्यात येइल. तसेच संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल.
24. वर्धा जिल्हयाबाहेर सक्षम अधिका-यांची परवानगी घेऊन जाऊन आल्यानंतर 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक राहील.
25. दुकानामध्ये ग्राहकांनी सोशल डिस्टंसींग पाळणे व दुकानात गर्दी होणार नाही ह्याची संपुर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदाराची राहील.यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्यास दुकानदार कार्यवाहीस पात्र राहील.
नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना
सायंकाळी 5.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या संचारावर पूर्णत: बंदी राहील. सर्व क्षेत्रात 65 वर्षावरील नागरीक, आजारी व्यक्ती, गर्भवती महीला, 10 वर्षाखालील मुले यांना सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर फिरता येणार नाही. केवळ वैद्यकीय कारणाकरीताच बाहेर जाण्यास परवानगी राहील.
लॉकडाऊनच्या कालावधीत मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबाजवणी करण्यात यावी.
1. सर्व प्रकारच्या कामकाजाकरीता सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेस मुभा राहील. मात्र सायंकाळी 5 ते सकाळी 7 या कालावधीमध्ये वैद्यकीय सेवा वगळता बाहेर फिरण्यास प्रतिबंध राहील.
2. सर्व दुकाने, बाजारपेठा वर्कशॉप हे सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेतच सुरु राहतील.
3. या आदेशान्वये परवानगी देण्यात आलेले सर्व दुकाने, आस्थापना, उद्योग, व्यवसाय यांना या आदेशात नमुद कोरोना विषयक खबरदारीच्या उपाययोजना राबवणे बंधनकारक राहील व कोणीही त्याचे पालन करण्यास कसूर केल्यास अशी दुकाने, आस्थापना, उद्योग, व्यवसाय कोणतही पूर्व सूचना न देता सील करण्यात येतील.
4. ऑटो रिक्षा सुरु ठेवता येईल परंतू ऑटो रिक्षा चालकाने 1+2 चे बंधन पाळणे आवश्यक राहील.
5. हॉटेल, रेस्टॉरेंट, खानावळ यांच्या Home delivery व काऊंटर सुविधा पूर्वीप्रमाणेच सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत सुरु राहतील कोणत्याही परिस्थीतीत डायनिंग सेवा सुरु करता येणार नाही.
6. यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या उद्योग, विविध आस्थापना यांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यक्यता राहणार नाही.