Home महत्वाची बातमी रेती चोरी चहूकडे , गेले R.T.O कुणीकडे?

रेती चोरी चहूकडे , गेले R.T.O कुणीकडे?

267

बेलोरा येथे अवैध रेती साठा…!

देवानंद जाधव

यवतमाळ , दि. १७ :- यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथे अडाण नदीमधुन राञंदिवस रेतीची चोरी केली जात आहे. पाण्याच्या टाकी जवळ शेकडो टॅकटर रेतीचा साठा केला आहे. महीला तलाठी , आणि कोतवाल यांना हाताशी धरून अमर्याद रेती चोरी केली जात आहे. अनेक ट्रॅक्टर वर वाहन क्रमांक नमुद नाहीं. परिवहन विभागा कडुन पासिंग नसलेले अनेक ट्रॅक्टर रेती चोरी साठी वापरले जात आहे. रेती चोरी कडे महसुल विभागाचे आणि विना क्रमांक ट्रॅक्टर कडे यवतमाळ आर.टी.ओ चे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. स्थानिक महसूल कर्मचारी आणि रेती चोरांचे अर्थ पुर्ण संबंध असल्याने दिवसरात्र अडाण नदीमधुन रेती चोरी करुन नदीचे लचके तोडले जात आहे. बेलोरा येथील अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. दिवसभर रेती चोरी करणार्या वाहनामुळे गावभर धुराळा उडत असल्याने ग्रामस्थांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. अडाण नदीच्या परिसरातील बेलोरा सह मंगरूळ, रुई, वाई,साकुर सह अनेक ठिकाणी रेती चोरी सुरू आहे. संचारबंदी आणि लाॅकडाऊन चा फायदा ऊचलत रेती चोर जागोजागी रेतीचा साठा करुन ठेवत आहे. बेलोरा येथील ” बाटरु”नामक दलाल रेती चोरांकडून वसुली करुन महसूल प्रशासनातील अतृप्त आत्मा असलेल्या कर्मचार्याकडे ” पाकिट “पोहचवतो. अडाण नदीच्या पाञात अनेकदा ओल्या पार्टीचे आयोजन केले जाते. अडाण नदीमधुन चोरुन नेलेल्या रेती मुळे नदीमध्ये पडलेल्या खड्यांचे मुल्यांकन करुन रेती चोरांना दंडीत करावे. आणि मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांना निलंबित करावे, अशी मागणी बेलोरा वासीयांकडुन केली जात आहे.