July 7, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

खरीप हंगामासाठी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु ; नोंदणीची अंतिम तारीख २७ मे – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड ,दि. १७ ( राजेश एन भांगे ) – खरीप हंगाम सन 2020-21 साठी पीक कर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी पुढील नमूद संकेतस्थळावर पीक कर्जाची मागणी नोंदणी ही 17 ते 27 मे 2020 या कालावधीत ऑनलाईन नोंदणीद्वारे करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जागतिक महामारी कोवीड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. बँकेतील गर्दीमुळे होणारा विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सन2020-21 या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehk6tQ6VGKaSH_LSQ6o4u2S7dNATKcjwOK2mKLfD8qD7He0g/viewform?usp=sf_link

ऑनलाईन पीक कर्ज मागणी नोंदणी 17 ते 27 मे 2020 या दरम्यान करावी.

ही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँक नांदेड मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येणार आहे. ही यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड, सात/बारा, आठ-अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज 2 फोटो, पासबुक या कागदपत्रांसह बँकेत उपस्थित रहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल याची संबंधीत शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!