July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सूचना अत्यंत योग्य, मंदिराच्या कोटरीत हजारो टन सोने नुसते पडून राहण्यापेक्षा अशा महामारीच्या संकट समयी त्या देवांनीच जनतेला तारण्याची जाणिव तरी होईल – मा गुरूनाथराव कुरूडे, माजी आमदार कंधार

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व अर्थ खात्याची पुरेपूर जाणिव असणारे मा.पृथ्वीराज चव्हाणांनी देशातील मोठमोठ्या देवस्थानातील सोने नुसते पडून राहण्यापेक्षा त्याचा उपयोग अशा “कोरोनाच्या महामारीच्या संकटात जनतेला वाचवण्यासाठी होत असेल तर या पेक्षा आणखी दुसरी महत्वाची बाब नाही. ज्या संस्थानचे सोने असते त्यांना २% व्याजाची रक्कम मिळेल व सोनेहि कुठे जाणार नाही.
नाहीतरी ती रक्कम किंवा सोने जनतेन दिलेली आहे.तेव्हा त्या जनतेवर आलेले हे महामारीचे संकट स्वतः देव तर टाळीत नाहीच. परंतु त्याच्या संपत्तीचा फायदा जनतेला जगण्यासाठी झाल्यास देवानेच त्या जनतेला वाचविण्याचे तरी श्रेय मिळेल. परंतु अशा चांगल्या सूचनेलाही विरोध दर्शविण्याच्या प्रवृत्ती आहेतच. त्यावर नकारात्क मते देवून चांगल्या सुचनेचा आदर पण करावयास तयार नाही. शेवटी हे सोने नुसते कोंडुन ठेऊन त्या पासून कोणाला फायदा मिळणार ? उलट कायमते जपण्यासाठी डोळ्यात तेल घालून जपावे लागेल. तेव्हा शासनाने मा.सुचनेचा जरूर फायदा घेऊन या महा – संकटातून वाचवावे असे आम्हाला मनस्वी वाटते.
अशी भावना यावेळी मा.गुरूनाथराव कुरूडे
माजी आमदार व स्वातंत्र्य सैनिक, कंधार यांनी व्यक्त केली.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!