Home विदर्भ अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री यांनी केली पाहणी.!

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री यांनी केली पाहणी.!

125

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १६ :- सेलू तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने सिंदी रेल्वे महसुल मंडळातील 8 गावातील घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या गावातील झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास , क्रिडा व युवक कल्याण तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी पाहणी केली.


श्री केदार यांनी चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी आमदार समिर कुणावार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसिलदार महेद्र सोनवने, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, गावातील सरपंच , तलाठी , ग्रामसेवक उपस्थित होते.
सेलू तालुक्यात 14 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंदी रेल्वे महसूल मंडळातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून प्राथमिक अंदाजानुसार चानकी -158, कोपरा-110, हिवरा-20, पिंपळगाव-20, वघाळा-20, टाकळी -6 देऊळगाव-3, दिंदोडा-7 या आठ गावातील 344 घरांचे अंशत: नुकसान झाले असून घराचे टीन पत्रे उडालेले आहे. चानकी व कोपरा गावातील नुकसान झालेल्या घरात असलेले धान्य तसेच कापूस ओला झाला. चानकी, कोपरा व पिंपळगाव येथील जनावरे जखमी झाले. उर्वरित पंचानामे सुरु असल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पालकमंत्री श्री. केदार यांना सांगितले.