Home मराठवाडा तीर्थपुरी , कुंभार पिंपळगाव येथे रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद….

तीर्थपुरी , कुंभार पिंपळगाव येथे रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद….

338

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – भारतीयघटना, व्यापारी महासंघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विद्यमाने तीर्थपुरीत मंगळवारी संयुक्तपणे रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन उक्कडगाव संस्थानचे मठाधिपती महंत डॉ.श्रीकृष्ण पुरी महाराज यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे श्रीकृष्ण बोबडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष बोबडे, जैन संघटनेचे नरेंद्र जोगड, योगेश अग्रवाल, गणेश बेंद्रे, पत्रकार बद्रिनाथ मते, रमेश बोबडे, गणेश खेत्रे, डॉ.दिगंबर गोरे,अलर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आशिष बोर्डे, माऊली दाबोले,कांता शिंदे, आत्माराम नाटकर, भगीरथ अग्रवाल, अशोक तोष्णीवाल,श्रीराम वाघ,शेख, वायकर, विजय उढाण यांची उपस्थिती होती.कुंभार पिंपळगाव येथे जैन संघटना आणि व्यापारी महासंघाच्या वतीने गुरुवारी,१४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्ता कंटुले, अतुल बोकन, जैन संघटनेचे नरेंद्र जोगड,लक्ष्मीकांत व्यवहारे,अमोल बुरशे , महावीर व्यवहारे, विजय कंटुले,अमित गुजर पवन राठी,शाम राऊत,प्रकाश कंटुले , अक्षय चांडक,निलेश तौर ,मयूर तापडिया, नितीन पंडा, रघुनंदन राठी, जगदीश बजाज, मोहन अवचार,पत्रकार अजय गाडे, दिनेश दाड,प्रविण संघवी आदींची उपस्थिती होती.तीर्थपुरी आणि कुंभार पिंपळगाव येथे प्रत्येकी ५० जणांनी रक्तदान केले असल्याचे सांगण्यात आले आहे.