Home मराठवाडा देगलूर शहर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच बँकांचा हलगर्जी पणा चव्हाट्यावर, ए.टि.एम रूम मध्ये नो...

देगलूर शहर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच बँकांचा हलगर्जी पणा चव्हाट्यावर, ए.टि.एम रूम मध्ये नो सोशल डिस्टेंसिग व नो सेनिटायझ

290

नांदेड , ( राजेश एन भांगे ) – देशात व राज्यात कोविड १९ कोरोना व्हायरसने आपले बस्तान चांगलेच पसरवले असतानाच नांदेडने सुद्धा अता या विषयात आघाडि घेतली आहे.

तरी जिल्हा प्रशासनाच्या, डाॕ. श्री विपीन इटनकर व श्री विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शना खाली देगलूर प्रशासकीय अधिकारी तहसिलदार मा.अरविंद बोळंगे, मुख्याधिकारी मा.गंगाधर इरलोड. तसेच पोलिस निरिक्षक मा.धबडगे व आरोग्य अधिकारी यांनी अत्ता पर्यंतची आपली चोख कामगिरी बजावत देगलूर शहराला कोरोना मुक्त ठेवाण्यात यश मिळविले असले तरी मात्र ए टि एम द्वारे (शेकडो नागरीकां मार्फत) रोज दिवसा घडिला लाखो रूपयाचे उलाढाल होत असताना देखील शहरातील बँक प्रशासनाच्या हलगर्जी पणा मुळेच ए.टि एम रूम मध्ये नो सोशल डिस्टेंसिग व नो सेनिटाझर अशी आवस्था असल्याने कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण केंद्र व राज्य शासनाच्या आद्यादेशाने सर्व राज्यातील व जिल्ह्यातील इतर ठिकाणी बाहेर गेलेले नोकर वर्ग व मजुर अता स्व,गावी परतु लागले आहेत त्यामुळेच अता पुर्वी पेक्षा ज्यास्त दक्षता घेण्याची गरज असुन तरी स्थानिक प्रशासनाने अता राहिलेल्या उनिवां कडे लक्ष देवुन येणाऱ्या काळाता सुद्धा आपले शहर कोरोना मुक्तच रहावे म्हणुन हलगर्जी पणाचे लक्षणे अंगीकारलेल्या बँक प्रशासनांना तत्काळ आपल्या सर्व ए टि,एम मशिन रूम मध्ये सोशल डिस्टेंसिग व सेनिटायझर च्या सुविधा द्याव्यात असे सक्त निर्देश द्यावे अन्यथा शहरात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव बळावल्यास त्याला जबाबदार कोण ?.