Home मराठवाडा दिलासादायक” आज दिवसभरात नांदेडात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, तर अबचल नगर येथील...

दिलासादायक” आज दिवसभरात नांदेडात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही, तर अबचल नगर येथील पहिला रुग्ण कोरोना मुक्त

517

नांदेड, दि.१३ ( राजेश एन भांगे ) – काल रात्री उशिरा पर्यंत नांदेड जिल्ह्यात दिवस भरात ग्रामीण आणि शहरी मिळून 11 पॉझिटिव रुग्णांचे निदान झाले होते व नांदेडचा आकडा 52 वरून थेट 63 वर पोहोचला होता. त्यामुळे काल दिवसभरात एकाच वेळी अकरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने, नांदेड जिल्ह्याला पुन्हा हादरा बसला होता. पण आज दिवस भरात जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील अबचल नगर भागात आढळलेला पहिला कोरोना पॉझिटिव रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे. त्यामुळे हळूहळू का होईना नांदेड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना पॉसिटीव्ह रुग्णां बरोबरच, एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने आता एकूण वाढत्या रुग्ण संख्येला उतरती कळा लागण्याची नांदेडकरांना आशा लागली आहे.

आता पर्यंतच्या प्राप्त अहवाला नुसार नांदेडच्या अबचलनगर येथील 26 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह असलेला एक रुग्ण काल मंगळवार 12 मे रोजी पूर्ण उपचारा नंतर त्यांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यांला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथून सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवार 13 मे रोजी सायं 5 वाजेपर्यंतच्या माहिती नुसार नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत प्रवासी, प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 3 हजार 142 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 131 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 879 स्वॅब तपासणीचा अहवाल हा निगेटिव्ह आला असून 157 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. यात आता पर्यंत घेतलेल्या स्वॅब पैकी एकुण 63 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या 63 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 11 रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे तर पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 43 रुग्णांवर आणि ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 63 आहे व एक रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह 5 मृत्यू झालेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेनी मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.