Home मुंबई धक्कादायक – महाराष्ट्रातील तब्बल १ हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा, राज्यातील...

धक्कादायक – महाराष्ट्रातील तब्बल १ हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा, राज्यातील कोरोना बाधित पोलिसांचा आकडा १००७ वर आता पर्यंत ७ जणांचा मृत्यू

213

विशेष प्रतिनिधी -राजेश भांगे

मुंबई , दि.११ – देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लॉकडाऊनच्या काळात दिवस रात्र एक करुन आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या राज्यातील तब्बल 1 हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 106 पोलीस अधिकारी आणि 901 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 7 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आता पर्यंत 113 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. अजूनही 887 पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा. असं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे.