Home महत्वाची बातमी देशात 12 मे पासून टप्प्या- टप्प्याने पॅसेंजर ट्रेन सुरू होणार – रेल्वे...

देशात 12 मे पासून टप्प्या- टप्प्याने पॅसेंजर ट्रेन सुरू होणार – रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

122

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

नवी दिल्ली , दि ११ – सुरुवातीला नवी दिल्लीतून काही स्पेशल ट्रेन्स धावतील देशातल्या 15 मुख्य शहरांपर्यंत प्रवास करतील आणि अडकलेल्या प्रवाशांची ने-आण करतील, असं गोयल यांनी ट्वीट करून म्हटलंय.

या 15 शहरांमध्ये दिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी यांचा समावेश असेल.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने स्थलांतरित मजुरांसाठीच्या दररोज 300 श्रमिक स्पेशल ट्रेन्स आणि कोव्हिड केअर सेंटरसाठीचे 20 हजार डबे वगळून इतर उपलब्ध डब्यांनुसार नवीन मार्गांसाठी रेल्से सुरू केली जाईल.

11 मे रोजी दुपारी 4 वाजल्यापासून या ट्रेनसाठी बुकिंग सुरू होईल. रेल्वेचं तिकीट https://www.irctc.co.in/ या वेबसाईटवरच उपलब्ध असेल.

रेल्वे स्टेशन्सवरील काऊंटर तिकीट विक्रीसाठी बंदच राहतील, तिथं कोणतंही तिकीट मिळणार नाही.

प्रवास करताना काय करावं लागेल?
1. अधिकृत तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे गाडीत प्रवेश दिला जाईल.

2. प्रवाशांनी मास्क किंवा तोंडाला रुमाल बांधणं अनिवार्य असेल.

3. रेल्वे स्थानकावर मेडिकल तपासणी केली जाईल.

4. कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाचा प्रवासाची मुभा दिली जाईल.

5. गाड्यांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल.