Home मराठवाडा ना.थोरात साहेब त्यांच्या वरीष्ठ नेतृत्वास कोटी-कोटी धन्यवाद व जय-क्रांति – गुरूनाथराव कुरूडे...

ना.थोरात साहेब त्यांच्या वरीष्ठ नेतृत्वास कोटी-कोटी धन्यवाद व जय-क्रांति – गुरूनाथराव कुरूडे मा.आमदार, कंधार

270

नांदेड, दि.११ ( राजेश भांगे ) – कंधार , कालच महाआघाडीची बैठक, विधान परिषदेची निवडणूक बिन विरोध करण्यासाठी बसल्याचे कळले होते.आज उठल्याबरोबरटि.व्हि.वर ववृतपत्रातून आलेली आनंदाची बातमी कळली मी अक्षरशः आनंदाने हर्ष उल्हाशीत झालो.सध्या “कोरोणा महामारीचा राक्षस”गरिब,शेतकरी व कामगारांना गिळंकृत करीत आहे.तर केंद्रात महाराक्षस याच वर्गाच्या मुळावर उठला आहे.अशा संकटाचे काळात महाआघाडीचे नेते मा.शरदराव पवार यांच्या प्रयत्नामुळे महाआघाडीची स्थापना झाली .सुदैवाने म्हणुन अशा समृध्द नेतृत्वाच्या मार्गदर्शना खाली राज्य करण्यासाठी मा.उध्दवजी ठाकरे यांच्या सारखे अत्यंत समंजस व सालस असे मुख्यमंत्री लाभले असतांना त्यांच्याच जागेला धोका निर्माण झाल्याने आपल्या विचाराची चिंताग्रस्त झाली होती.अशा पाश्व भूमीवर आपल्या बैठकीत आपण व आपल्या नेतृत्वाने ही निवडणूक “बिन विरोध“करण्याची महान निर्णय घेऊन सरकार व आलेल्या महामारी कोरोनाच्या संकटातून मुक्त केल्याने आम्हा सर्वाना मनस्वी आनंद झाला आहे. अशा संकट समयी आपण व आपल्या वरीष्ठ नेतृत्वानी घेतलेल्या निर्णया मुळे जनतेस व माझ्या सारख्या ९०व्या वर्षाच्या कार्यकत्यास झालेल्या आनंद अर्वनीय आहे. त्यामुळे आपणास व आपल्या कार्यास कोटी-कोटी धन्यवाद व मानाची जय-क्रांति….!