Home मराठवाडा जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस , “वीज पडून एक ठार”

जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस , “वीज पडून एक ठार”

31
0

लक्ष्मण बिलोरे

जालना – जालना जिल्ह्यात सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चांगलीच त्रेधातिरपीट उडाली .

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे वीज पडून नितीन मैंद हा युवक मृत्यूमुखी पडला .वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला वादळी वाऱ्याने घरे आणि शाळांवरिल पत्रे उडाली.बाजरी, मोसंबी,आंब्याचे नुकसान झाले. बदनापूरयातील कंडारी येथे वादळी वारा, विजांचा लखलखाट व पाऊस झाला, त्यामुळे गावातील जिल्हा परिषद शाळेवरील टीन पत्रे उडून गेली असून गावातील बऱ्याच घरावरावचे पत्रे उडून गेली असून शाळेतील कपाट रजिस्टर धान्याच्याकोठी आदीचे नुकसान झाले . घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव,भानुसे बोरगाव,जिरडगाव,राजेगाव येथे गारांच्या पावसामुळे मोसंबीच्या बागा डाळिंबाच्या बागा ,अंबा आदी फळ बागांचे नुकसान झाले.तिर्थपुरी परिसरात गारांचा पाऊस झाला.राजाटाकळी,गुंज भादली शिवणगाव लिंबीमुर्ती धामणगाव पिंपरखेड खड्का लिंबोणी भागात विजांचा कडकडाट आणि जोराचा वारा सुटला होता, जोरावर पाऊस पडला.जिल्ह्यात तासभर चाललेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे सदरील गारी या बोराच्या आकारापेक्षा मोठ्या होत्या , असे राजेगाव येथील शेतकऱ्यांनी कळविले.मासेगाव शेतशिवारात पपईची मोठ्याप्रमाणात लागवड असून वादळीवारा आणि गारांच्या पावसामुळे पपईचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी कळविले आहे.अंगणात पडलेल्या गारा पहिल्या असून शेतकत्यांचे मोठे नुकसान झाले असून राजूर चनेगाव ,चांधाई एक्को,तपोवन परिसरात देखील पाऊस झाला आहे ग्रामीण भागातील शेतकरी जनता मात्र कोरोनाच्या धास्तीने हैराण झाले असून त्यातच या अस्मानी संकटामुळे भांबावून गेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे .

Unlimited Reseller Hosting