Home मराठवाडा जालना जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले…!

जालना जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले…!

172

लक्ष्मण बिलोरे

जालना – जिल्ह्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली असतांनाच जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दोन आणि जालना तालुक्यात एक असे तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. अंबड तालुक्यातील कानडगाव येथील दोन आणि जालना तालुक्यातील जामवाडी येथील एक अशा तीन संशयित रुग्णांनाच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे दि.8 मे रोजी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर तिन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले , असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.