
मेहकर ला कार्यवाही केव्हा होणार ?
शेख सादिक कुरेशी
मेहकर ,
आज सकाळी 10 वाजता डोणगाव येथे छापा मारून पोलिसांच्या पथकाने सुमारे 96 हजारांचा गुटखा पकडला…डोणगाव येथील आरोपी शेख फहीम शेख कय्युम (वय 28 वर्षे) याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे…आरोपीचे ताज स्वीट अँड मार्ट सेंटर नावाचे दुकान आहे… या दुकानातूनच गुटखा जप्त करण्यात आला… एलसीबीच्या पोउपनी मुकूंद देशमुख, पोना लक्षमण कटक, पोना रघुनाथ जाधव, पोना विजय दराडे, पोका श्रीकांत चिंचोले यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली…
मेहकर ला कार्यवाही केव्हा होणार ?
सध्या मेहकर शहर व तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री व तस्करी केली जात असून या कडे पोलीस व अन्न औषध प्रशासन विभाग डोळेझाक करीत आहे सर्वत्र लोकडाऊन सुरू असतांना विक्रेते खुलेआम आपला वयवसाय करीत आहे , मेहकर ला कार्यवाही केव्हा होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक करीत आहे ,











































