Home महत्वाची बातमी खाजगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टर्स वर कडक कार्यवाही करावी – अनिल हमदापुरे

खाजगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टर्स वर कडक कार्यवाही करावी – अनिल हमदापुरे

104

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना मनसेची मागणी.

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कार्यवाहीचे आश्वासन.

यवतमाळ – जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासन योग्य पावले उचलत असताना अश्या वेळी एक महत्वाचा घटक म्हणजे खाजगी डॉक्टर हा पण आहे .यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चिकन गुणिया व इतर साथीच्या रोगा समयी १६ तास दवाखान्यात वेळ देणारे डॉक्टर आज कोरोनाच्या भीतीने भूमिगत झाले आहेत.एकीकडे सरकारी डॉक्टर आपले जीव धोक्यात घालून कोरोना च्या लढाईत आपले योगदान देत असतांना जिल्ह्यातील काही मोजकेच डॉक्टर सामाजिक बांधीलकी जोपासत आहेत.या संकटात जनतेला वाऱ्यार सोडणाऱ्या संधीसाधू डॉक्टर्स वर कडक कार्यवाहीची मागणी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी पालकमंत्री संजयभाऊ राठोड आणि जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदनाद्वारे केली.
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली रोगप्रतिकार शक्ती टिकविण्यासाठी तसेच इतर आजार त्यात शुगर, हृदय विकार, किडनी ,डोळ्याचे आजार,मुख रोग,लहान मुलांचे आजार,कॅन्सर,अस्थिव्यंग,त्वचा विकार,नाक कान घसा,यासह किरकोळ बिमारी साठी सर्व सामान्य जनतेला वणवण फिरावे लागत आहे.मोजकेच दवाखाने उघडले असल्यामुळे त्या डॉक्टर कडे खुप गर्दी होत आहे.शासनाने कोरोनाच्या या संकट प्रसंगी जे डॉक्टर जनतेला सहकार्य करणार नाहीआणि आपले खाजगी दवाखाने बंद ठेवतील त्यांच्या वर कडक कार्यवाही चे सूचना देऊन सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश डॉक्टरांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत फक्त सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.मनसेने दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने तात्काळ उघण्याचे आदेश द्यावे तसेच या संकट समयी आपल्या घरी बसणाऱ्या आणि जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या डॉक्टर्स वर शासन निर्देशानुसार कार्यवाही करावी जेणे करून सर्व सामान्य जनतेची या संकट समयी होणारी फरफट थांबेल एवढी रास्त अपेक्षा मनसेने तसेच जिल्ह्यातील यवतमाळ कर जनतेच्या वतीने दिलेल्या निवेदनात व्यक्त केल्या यावर जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्ह्यातील अश्या सर्व डॉक्टर्स वर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन मनसेचे अनिल हमदापुरे यांना दिले.