Home विदर्भ ऑनलाइन हिंदी मराठी गीत गायन स्पर्धेत पुणे येथील आशुतोष सुरजूसे प्रथम विजेता...

ऑनलाइन हिंदी मराठी गीत गायन स्पर्धेत पुणे येथील आशुतोष सुरजूसे प्रथम विजेता , तर हिंगणघाट येथील सुरेंद्र डोगंरे द्वितीय…

123

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – ऑनलाइन हिंदी मराठी गीत गायन स्पर्धेत पुणे येथील आशुतोष सुरजूसे प्रथम विजेता , वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील सुरेंद्र डोंगरे द्वितीय तर वर्धा येथील सानिका बोभाटे तृतीय , उषा क्रिएशन पुणे तर्फे आयोजित ऑनलाईन हिंदी मराठी गीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यात लॉक डाऊन घोषित केल्यामुळे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे . त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या गीत गायन स्पर्धा आळा बसला होता . याच पार्श्वभूमीवर पुणे येथील उषा क्रिएशन द्वारे गीत गायन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे व्हाट्सअप द्वारे व्हि .डि .ओ . तयार करून ऑनलाइन पाठविण्याचे आव्हान उषा क्रिएशन चे संयोजक अतुल झोड स्पर्धकांना केले होते . ऑनलाईन स्पर्धेत राज्यातील 65 स्पर्धकांनी गीत गायन केलेले व्हि .डि .ओ. आयोजकांकडे पाठविले होते . प्रथम फेरीतील व्हि डि ओ चे परीक्षक म्हणून संगीततज्ञ सतिश वानखेडे, प्रवीण काळे ,सचिन राऊत , अमोल खंडार , गजानन काळे यांनी काम पाहिले . 65 स्पर्धक आतून पहिल्या फेरीत अंतिम फेरीसाठी 12 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती .
अंतिम स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांचे आयोजका तर्फे पुन्हा व्हाट्सअप द्वारे गायन केलेले व्हिडिओ मागण्यात देण्यात आले होते . अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून संगीततज्ञ प्रदीप इंगळे , शैलेश देशमुख ,नीलेश इंगळे , या परीक्षकांनी अंतिम निकाल जाहीर केला . ऑनलाइन गीत गायन स्पर्धेत प्रथम विजेता म्हणून पुणे येथील आशुतोष सुरजुसे याला कुंदई खवय्या तर्फे 10 हजार रुपये बक्षीस , तर उपविजेता म्हणून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार फेम सुरेंद्र डोंगरे याला रिटरीक्स तर्फे 7 हजार रुपये तर वर्धा येथील तृतीय पुरस्कार प्राप्त सानिका बोभाटे हिला साई हार्डवेअर खरंगाना तर्फे 5 हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले आहे .
प्रोत्साहनपर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील श्रुती सरोदे , गडचिरोली येथील रश्मी भाटी , नागपूर येथील दीक्षा खोब्रागडे , अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अनुष्का गारपवार , नागपूर येथील सुमेधा बालपांडे , माहीर भागवत , चारू मोंडले , तनिष गजभिये यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे . सदर ऑनलाइन गीत गायन स्पर्धा यशस्वी करण्याकरिता उषा क्रिएशन चे संयोजक सौ उषा झोड , रोशन मोरे, प्रफुल झोड , विशाल देशमुख , हेमंत तेलंग , प्रशांत मृत्यारपवार , रवी गेडाम , रोशन दूध कोहळे , इत्यादीने अथक परिश्रम घेतले .